Take a fresh look at your lifestyle.

या साखरेचे करायचे काय..? कारखान्यांचा पाय खोलात, पाहा किती साखर गोदामात सडत पडलीय..?

मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड होते. पर्यायाने साखर कारखान्यांची (sugar factory) संख्याही मोठी आहे. मात्र, सध्या हे साखर कारखाने चालविणे म्हणजे ‘पांढरा हत्ती’ पोसण्यासारखे आहे. अनेक सहकारी कारखाने तर कर्जाच्या खाईत बुडाले आहेत. तथाकथित साखर सम्राटांनी चावून चावून या कारखान्यांचा अक्षरशः चोथा केलाय. काही कारखान्यांची विक्री झाली, तर काही कारखाने रडत-कढत कसेतरी सुरु आहेत. मात्र, त्यांच्यापुढचे शुक्ल काष्ठ काही केल्या संपत नाही.

Advertisement

कोरोनामुळे (corona) बहुतेक उद्योग-धंदे बंद पडले आहेत. त्यातून साखर कारखानदारीही सुटलेली नाही. उन्हाळ्यात शीतपेये, मिठाई व्यवसाय बंद आहे. परिणामी साखरेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. मागील सलग दोन हंगामात देशांतर्गत बाजारपेठेत हीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात सुमारे 143 लाख टन साखरसाठा पडून आहे.

Advertisement

एका बाजूला मालाला उठाव नसताना, दुसरीकडे साखर उत्पादन मोठया प्रमाणात सुरूच आहे. या शिल्लक साखरेचे करायचे काय? असा प्रश्न कारखानदारीपुढे निर्माण झाला आहे. साखर विकल्याशिवाय कारखान्याचे अर्थकारण चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. साखरेचा आधीच कमी असणारा दर, त्यात कर्जाचे वाढते प्रमाण, यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे.

Advertisement

गेल्या वर्षीची 107 टन साखर अजून गोडाऊनमध्ये पडून आहे. यंदाच्या हंगामात देशपातळीवर 303 लाख टन साखरउत्पादन झाले. त्यामुळे देशभरात 410 टन साखर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फक्त महाराष्ट्राचा विचार केला, तरी 143 लाख टन साखरसाठा शिल्लक आहे. या साखरेची विक्री करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे.

Advertisement

साखरेच्या एका पोत्यामागे कारखानदारांना दररोज एक रुपया व्याज भरावे लागत आहे. शिल्लक साखरेची विक्री लवकर झाली नाही, तर साखर उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. साखर कारखानदारी वाचवण्यासाठी साखरेची किंमत 37 रुपये किलो करण्याची गरज आहे. तसेच कारखानदारी वाचविण्यासाठी 4 हजार कोटींची मदत करण्याची मागणी राज्य साखर संघाने केली आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनीदेखील साखर कारखानदारीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली करून शिल्लक साखरेच्या विक्रीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply