Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ दानविरालाही आईसाठी मिळालाच नाही बेड; पहा त्यांनी आता काय म्हटलेय मोदीजींना

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना कालावधीत देशाच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी पीएम केअर नावाचा खास फंड स्थापन केला होता. अनेकांनी त्यात भरभरून दान दिले. मात्र, तरीही दुसऱ्या करोना लाटेत देशभरात औषधे आणि ऑक्सिजनसाठी भारतीयांना वणवण करावी लागली. पीएम केअरमध्ये अहमदाबाद (गुजरात) येथील रमेशभाई विजय पारिख यांनीही अडीच लाख दान दिले होते. मात्र, तरीही त्यांना दुसऱ्या लाटेत आईसाठी रुग्णालयात बेड मिळाला नाही.

Advertisement

https://www.facebook.com/photo?fbid=321453659345554&set=a.265453598278894

Advertisement

रमेशभाई विजय पारिख यांनी याबाबतची आपली व्यथा ट्विटरवर मांडली आहे. त्यांनी पीएम केअरसाठी दिलेल्या निधीचा पुरावा म्हणून एक पत्रही शेअर केले आहे. त्यात दिसत आहे की, १० जुलै २०२० रोजी पारीख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फंडमध्ये २ लाख ५१ हजार रुपये दान दिलेले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हे दानही माझ्या आजारी आईला बेड देऊ शकलेले नाही. आता तिसऱ्या लाटेत आम्हाला बेड मिळण्यासाठी किती दान द्यावे लागेल याचे मार्गदर्शन करावे. त्यांनी हे ट्विट पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मंत्री स्मृती इराणी आणि राष्ट्रपती भवन यांना टॅग केले आहे.

Advertisement

Vijay Parikh on Twitter: “Donation of 251k couldn’t ensure bed for my dying mother. Pls advise how much more should I donate to reserve berth for the 3rd wave so I don’t lose any more members..@PMOIndia, @rajnathsingh, @RSSorg, @smritiirani, @rashtrapatibhvn https://t.co/9a66NxBlHG” / Twitter

Advertisement

एनडीटीव्ही इंडिया यांचे ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनीही याबाबत फेसबुकवर लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अहमदाबादचे रमेशभाई विजय पारीख यांनी पीएम केअरस अडीच लाख रुपयांची देणगी दिली. त्यांच्या आईला रुग्णालयात बेड मिळालं नाही. आता ते लिहित आहेत की कृपया सांगा की, तिसऱ्या लाटेत किती दान द्यायचे? हे कोणीतरी ऐकून घेत आहे का? दररोज वृत्तपत्रे आणि चॅनेलचे प्रेक्षक व वाचक नवीन बातम्या आणि वादविवादाच्या शोधात फिरतील. जे लोक जिथे राहत होते ते तेथेच राहतील. कदाचित तेही काहीतरी नवीन शोधू लागतील. गोष्टी पुन्हा तशाच राहतील. आणि देशाची परिस्थितीही..

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply