Take a fresh look at your lifestyle.

अखेर आलेच वास्तवाचे भान; पहा आरोग्य व्यवस्थेबाबत नेमके काय म्हटलेय केंद्र सरकारने

दिल्ली : देशातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती फार चांगली राहिलेली नाही, करोना संकटाने हे दाखवून दिले आहे. दुसऱ्या लाटेत करोनाचे रुग्ण वाढल्याने देशातील आरोग्य पुरती कोलमडली. दवाखान्यात ऑक्सिजन नाही, वैद्यकीय उपकरणे नाहीत, रुग्णांना उपचार मिळत नाहीत, करोनाच्या दुसऱ्या लाटेत रोजच या बातम्या येत होत्या. देशातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती. आता खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीच यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Advertisement

करोना संकटात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. देशातील आरोग्य व्यवस्थसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. देशात कोणीही उपचारांविना राहू नये, यासाठी आरोग्य क्षेत्रातील अन्य संस्थांनीही या कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. देशात करोनाचे अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेने जास्त नुकसान केले आहे. आता या लाटेचा जोर कमी होत असला तरी मृत्यूदर वाढत आहे. दुसरी लाट आली त्यावेळी लाखोंच्या संख्येत रुग्ण सापडत होते. एक वेळ तर अशी आली होती, की एकाच दिवसात चार लाख रुग्ण सापडत होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येणे सहाजिकच होते. घडलेही तसेच. या काळात आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. सरकारी दवाखान्यांची स्थिती आजही किती गंभीर आहे, हे प्रकर्षाने दिसून आले. आरोग्यासारख्या महत्वाच्या गोष्टीकडे सर्वच सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम होता.

Advertisement

करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी या आजाराचा धोका कायम आहे. पुन्हा अशीच स्थिती निर्माण होणार नाही,  याची शाश्वती देता येत नाही. हे आता केंद्र सरकारच्याही लक्षात आले आहे. त्यामुळेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकार त्या दिशेने प्रयत्न करत आहे. राज्यांनीही नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात देशातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ शकते. दरम्यान, करोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी एका दिवसात लाखो नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे धोका कायम आहे. या आजारातून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपासून रुग्ण संख्येत घट होत असल्याने निर्बंधात सवलत देण्याचा विचार देशातील राज्ये करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply