Take a fresh look at your lifestyle.

करोना नियंत्रणासाठी सुरू आहे ‘हा’ विचार; पहा निर्बंध कमी करण्याबाबत काय होऊ शकते कार्यवाही?

मुंबई : राज्यात करोना विषाणूची दुसरी लाट आता कमी होत आहे. काही दिवासांपासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. करोनातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. असे असले तरी काही जिल्ह्यांनी मात्र टेन्शन वाढवले आहे. राज्यात अजूनही १८ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या जिल्ह्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यात करोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Advertisement

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती गंभीर आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी या आजाराचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणी सावध राहण्याची आवश्यकता आहे. राज्यातील मोठ्या शहरात आता करोना नियंत्रणात येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरात रुग्णसंख्या कमी होत आहे. रिकवरी रेटही वाढला आहे. राज्यातील परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध कमी करण्याचाही विचार राज्य सरकार करत आहे.

Advertisement

राज्यात काही जिल्ह्यात मात्र करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यांनी आता होम आयसोलेशन बंद करावे, कोविड सेंटरची संख्या वाढवावी. तसेच रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आयसोलेट करावे, असे आदेश देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या एकूण पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, म्हणून या जिल्ह्यांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

म्युकरमायकोसिस हा आजार राज्यात बळावत आहे. काही दिवसात या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्यामुळे या आजारास नोटिफाइड डिसीज म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता या आजाराबाबत माहिती सरकारला देणे बंधनकारक राहणार आहे. या आजारावरील औषधे उपलब्ध करण्यासाठी लववकरच ग्लोबल टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे.

Advertisement

दरम्यान, राज्यात आता करोना नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्बंधात सवलत देण्याचा विचार केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जे जिल्हे अद्याप रेड झोनमध्ये आहेत, त्याठिकाणी निर्बंधात सवलत मिळण्याची शक्यता कमीच आहे. अन्य जिल्ह्यात मात्र निर्बंध कमी करण्याचा सरकारचा विचार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे, या बैठकीत निर्णय होईल असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply