Take a fresh look at your lifestyle.

करोनातून बरे झालेल्या मुलांना ‘मीस’चा धोका; पहा कोणती आहेत लक्षणे आणि उपचारासाठीच्या औषधांची माहिती

औरंगाबाद : पहिल्या लाटेत मुलांना न बाधणारा करोना विषाणू दुसऱ्या लाटेत थेट चिमुरड्यांनाही आजारी करीत आहे. खरे म्हणजे मुलांचा यातला रिकव्हरी रेट खूप चांगला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. त्याचवेळी करोनामुक्त झालेल्या मुलांना आता मीस नावाच्या आजाराची बाधा होत असल्याची माहिती पुढे आलेली आहे.

Advertisement

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात महिनाभरात तब्बल १०० पेक्षा जास्त करोनाबाधित मुलांना बरे झाल्यावर मीस (मल्टिसिस्टिम इफ्लमॅटरी सिंड्रोम) नावाचा आजार झाला आहे. या आजारावर औषध उपलब्ध आहे. इम्युनोग्लोबिलिन इंजेक्शनने मीस हा आजार बरा होतो. त्यासाठी एका किलोसाठी २ ग्राम इतके हे इम्युनोग्लोबिलिन इंजेक्शन लागते. त्यानुसार उपचाराचे नियोजन करावे लागते. याच्या १ ग्रामसाठी १५०० रुपये लागतात. त्यामुळे याचेही उपचार महागडे ठरत आहेत. घाटी बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी म्हटले आहे की, करोनातून बरे झाल्यावर दुसऱ्या आठवड्यापासून ते तीन महिन्यांपर्यंत केव्हाही इम्युनोग्लोबिलिन इंजेक्शनची गरज पडू शकते.

Advertisement

घाटी रुग्णालयात सध्या १३ मुलांवर याचे उपचार सुरू आहेत. लहान मुलांच्या उपचारात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या इम्युनोग्लोबिलिन औषधाची जमवाजमव त्यामुळे सध्या सुरू आहे. दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि कोरोना रुग्णांना म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण झाल्यावर सध्या पचारासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या अॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचाही सध्या तुटवडा असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली सुरू केली आहे. इम्युनोग्लोबिलिन औषधीचा साठा मिळवण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कार्यवाही सुरू केली आहे.

Advertisement
मीस आजाराची लक्षणे :
कोरोनामुक्त लहान मुलाचे डोळे लाल होणे
अंगावर सूज आणि पूरळ येणे
तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप

 

Advertisement

वरील लक्षणे दिसल्यास तातडीने बालरोगतज्ञ डॉक्टर यांच्याकडे पालकांनी संपर्क साधावा. करोना झालेला आणि त्यातून बरे झालेल्या मुलांनाच याची बाधा होते. त्यामुळे इतर पालकांनी यामुळे भितीसदृष्य वातावरणात राहू नये. अशावेळी सध्या मुलांनाही मास्क घालून फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यास लावून त्यांना करोनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply