Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानच्या डोकेदुखीत झाली वाढ; पहा बायडेन यांनी कसा दिलाय इम्रान खान सरकारला झटका

वॉशिंग्टन : भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या मुजोर पाकिस्तानला अमेरिकेने जोरदार झटका दिला आहे. याबाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सुद्धा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचेच अनुकरण करत आहेत. अमेरिकेने हा निर्णय घेतल्याने कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहे.

Advertisement

कधी काळी पाकिस्तान अमेरिकेचा मित्र देश म्हणून ओळखला जात होता. याचाच गैरफायदा घेत पाकिस्तान अमेरिकेकडून अब्जावधीचा निधी मिळवत होता. आणि हाच पैसा दहशतवादी कारवायांना पाठबळ देण्यासाठी वापरला जात होता, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. भारताने वारंवार याबाबत तक्रार केली होती. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता मात्र जागतिक राजकारण फिरले आहे. पाकिस्तानच्या कुरापती अमेरिकेच्या लक्षात आल्या आहेत. त्यामुळेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी २०१८ मध्ये पाकिस्तानला देण्यात येणारा सुरक्षा सहाय्यता निधी बंद करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

त्यामुळे पाकिस्तानला सहजासहजी मिळणारा अब्जावधींचा निधी एका झटक्यात बंद झाला. ट्रंप यांच्या कार्यकाळात या निर्णयात कोणताही बदल झाला नाही. त्यानंतर जो बायडन कार्यकाळात अमेरिका हा निर्णय मागे घेईल, असे पाकिस्तानला वाटत होते. प्रत्यक्षात मात्र बायडन यांनी सुद्धा ट्रंप यांचा हा निर्णय कायम ठेवला आहे. भविष्यात या निर्णयात काही बदल होईल किंवा नाही, यावर आताच काही सांगता येणे शक्य नाही, असे पेंटागनचे माध्यम सचिव जीन किर्बी यांनी सांगितले.

Advertisement

काही वर्षांपासून पाकिस्तान आणि चीन यांच्यात मित्रत्व वाढत आहे. चीनकडून पाकिस्तानला आर्थिक मदतही मिळत आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे चीनची दादागिरी वाढत चालली आहे. चीनच्या या दादागिरीस रोखण्यासाठी अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्यासह अन्य देश एकत्र आले आहेत. तसेच काही वर्षांपासून अमेरिका भारतास मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे. त्यामुळे पाकिस्तान बाजूला पडला आहे. चीनकडून मदत मिळत असली तरी पाकिस्तानसाठी भविष्याते हे धोक्याचेच ठरणार आहे. कारण, चीनचे खरे मनसुबे अजूनही पाकिस्तानला माहिती नाहीत. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला मदत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेकडून निधी मिळवून हा निधी भारता विरोधात दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान वापरत होता. आता मात्र पाकिस्तानचे हे उद्योग अमेरिकेच्याही लक्षात आले आहेत. सुरक्षा सहाय्यता निधी न देण्याचा निर्णय बायडन यांनीही कायम ठेवला आहे. भारताच्या दृष्टीनेही हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. पाकिस्तानला मात्र यामुळे मोठा धक्का बसला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply