Take a fresh look at your lifestyle.

पिवळ्या बुरशीबद्दल ‘हे’ आहे का तुम्हाला माहित?; पहा याचा संबंध व लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

पुणे : सध्या करोना विषाणूसह काळ्या आणि पांढऱ्या बुरशीजन्य आजाराशी लढणाऱ्या भारतीयांना पिवळ्या बुरशीचे नवे संकट अनुभवावे लागत आहे. ही बुरशी प्रथमच मानवाच्या शरीरात सापडली आहे. ही बुरशी प्राणघातक समजली जाते. उत्तरप्रदेश राज्यातील गाजियाबाद येथे या पिवळ्या बुरशीचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

ईएनटी (नाक, कान व घसा) सर्जन डॉ. बी. पी. सिंह यांनी याबाबत म्हटले आहे की, गाझियाबादमध्ये आलेला रूग्ण हा संजय नगरचा रहिवासी होता. अनुनासिक एन्डोस्कोपीनंतर त्यांना पिवळ्या बुरशीची लागण झाल्याचे आढळले आहे. ही बुरशी प्रथमच मानवांमध्ये आढळली. आतापर्यंत पिवळ्या बुरशीमुळे सरडा, पाल आणि सरपटणारे प्राणी यासारख्या प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. ही मानवी शरीरावर जखमा करून सेप्टीसीमियासारखा आजारास जबाबदार असू शकते. अनेकदा सर्व अवयव यामुळे खराब होऊ शकतात. यामुळे अवयव काढावे लागू शकतात.

Advertisement
याचे लक्षण :
नाक बंद होणे
शरीरातील काही भाग व अवयव सुन्न पडणे
अंगदुखी
करोनामुळे शरीरामध्ये जास्त विकनेस जाणवणे
हार्ट बीटमध्ये वाढ
शारीरिक जखम झाल्यास जास्तवेळ खराब रक्त व पू वाहने
शरीर कुपोषित झाल्यासारखे दिसणे

 

Advertisement

डॉक्टरांच्या मते पिवळ्या बुरशीचे कारण अस्वच्छ वातावरण हे आहे. मात्र, त्यावर अजूनही जास्त संशोधनाची आवश्यकता आहे. ही बुरशी सामान्यतः जमिनीवरच मातीत आढळते. पाल किंवा सरडा या सरपटणारे प्राण्याची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यास ही बुरशी त्यांच्यात वाढते आणि त्याच्यासाठी जीवघेणी बनते.

Advertisement
प्रतिबंधात्मक उपाययोजना :
घरामध्ये चांगली साफसफाई आणि स्वच्छता ठेवावी
करोना रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यांची विशेष काळजी घ्यावी
खराब आणि दुर्गंध येणाऱ्या शिळ्या अन्नपदार्थाचे सेवन करू नये
घरामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता राहणार नाही याची काळजी घ्या
कुबटपणा आणि अस्वच्छ वातावरण वाढणार नाही याची काळजी घ्या
घरातील आर्द्रता 30-40 पेक्षा जास्त वाढणार नाही याची काळजी घ्या
ताजे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे अन्न खावे
पाणी जास्त प्यावे, तसेच पाणी स्वच्छ असावे

 

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply