Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ 34 लाख मुत्यूला चीनच जबाबदार?; पहा कशा पद्धतीने नडला बेजबाबदारपणा..!

दिल्ली : मुजोर शेजारी असलेल्या चीनच्या कृपेने आपल्या सर्वांना नेमके काय भोगावे लागणार, असाच प्रश्न दररोज पडत आहे. कारण, चीनचा बेजबाबदारपणा आणि त्यामुळे जगामध्ये होणारी डोकेदुखी हा एक सामान्य विषय बनला आहे. वूहान शहरातून अवघ्या जगभरात करोना विषाणूचा फैलाव करण्यास जबाबदार असलेल्या चीनने याचे सत्यही समोर येऊ देण्याचे टाळले आहे. मात्र, सत्य हे कधीतरी समोर येतेच. त्याचाच प्रत्यय आताही जगाला आला आहे. कारण, चीनच्या बेजबाबदारपणामुळे करोना विषाणूचा फैलाव होऊन तब्बल 34 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या कामाबद्दल अनेक उलटसुलट बातम्या अनेकदा आलेल्या आहेत. आता हे उघड झाले आहे की, नोव्हेंबर 2019  मध्ये या प्रयोगशाळेत काम करणारे तीन संशोधक आजारी पडले होते. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, ही महत्वाची माहिती चीनने लपवून ठेवली आणि जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेच्या वॉल वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकेच्या एका अज्ञात गुप्तचर अहवालाचा हवाला देत हा खुलासा केला आहे.

Advertisement

करोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेला या अहवालामुळे मदत होऊ शकते. आज डब्ल्यूएचओची एक बैठक होणार असून त्यात विषाणूच्या उत्पत्तीविषयी चर्चा केली जाणार आहे. त्याचवेळी ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात हा अहवाल स्टेट डिपार्टमेंट फॅक्ट शीटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. चीनमधील वुहान लॅबमध्ये आजारी पडलेल्या तीन संशोधकांच्या बातमीबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही तज्ञांनी याला कोविडच्या उत्पत्तीसंदर्भातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून संबोधित केले आहे, तर काहींनी याबाबत सांशकता वक्त केली आहे.

Advertisement

जगातील अनेक अव्वल एपिडेमिओलॉजिस्ट आणि व्हायरोलॉजिस्ट असा विश्वास करतात की, कोविड 19 साथीच्या रोगामुळे SARS-CoV-2 याची उत्पत्ती नोव्हेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहानमधून झाली. मात्र, चीनने हे सत्य नसल्याचा दावा केला आहे. चीनचे म्हणणे आहे की, विषाणूची पहिली पुष्टी झालेली घटना 8 डिसेंबर 2019 रोजीची आहे. त्यावेळी एका व्यक्तीमध्ये हा विषाणू सापडला होता. त्याचवेळी वुहान इन्स्टिट्यूटमध्ये आजपर्यंत वटवाघूळ प्राण्यात सापडलेल्या कोरोना विषाणूवर केलेल्या व्यापक संशोधनाच्या नोंदी, माहिती आणि प्रयोगशाळेचे अहवाल अजूनही जगासाठी खुले झालेले नाहीत. त्यामुळे चीनवरील संशय आणखी वाढला आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply