Take a fresh look at your lifestyle.

‘पंजाबी शेतकऱ्यां’ची कमाल; आंदोलन काळातही गव्हाचे विक्रमी उत्पादन; पहा कसे झाले हे साध्य

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लागू केलेल्या कृषी सुधारणा विधेयकामुळे हमीभाव हा मुद्दा बंद होण्याच्या शक्यतेने उत्तर भारतातील शेतकरी आक्रमक आहेत. त्यासाठी त्यांचे मागील सहा महिन्यांपासून दिल्लीच्या परिसरात आंदोलन चालू आहे. दरम्यानच्या काळात त्याची शेती अजिबात उघड्यावर पडलेली नाही. उलट ‘पंजाबी शेतकरी’ म्हणून हिणवल्या गेलेल्या या शेतकऱ्यांनी चक्क गव्हाच्या विक्रीचा विक्रम आणि उत्पादनही जास्त घेऊन दाखवले आहे.

Advertisement

खलिस्तानी, पाकिस्तान समर्थक आंदोलक, देशद्रोही यासारख्या शेलक्या विशेषणांनी भाजप नेते आणि कार्यकर्ते यांनी या आंदोलक शेतकऱ्यांना पाण्यात पाहिले आहे. मात्र, तरीही मानसिकता कायम ठेऊन हे शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात शड्डू ठोकून आहेत. शेतकरी इकडे दिल्लीत आंदोलनात व्यस्त असताना त्यांच्या कुटुंबीयांनी शेतातील धरणे आंदोलन यशस्वी करून दाखवले आहे. शेतकऱ्यांच्या पत्नी, मुले अाणि मुलींनी दुहेरी भूमिका बजावताना केवळ स्वयंपाकघर नाही तर शेती फुलवली आहे. त्याद्वारे त्यांनी दि. १३ मेपर्यंत १३२ लाख १६ हजार १८७ मेट्रिक टन गव्हाच्या पिकाची मंडईत विक्री करून दाखवली आहे. हा एक विक्रम आहे.

Advertisement

महिला शेतकऱ्यांनी शेतात फावडे, कुदळ मारण्याबराेबरच ट्रॅक्टरही चालवणे, पेरण्या, खत, फवारणीपासून ते कापणीदेखील स्वत:च केली. त्याचा परिणाम म्हणजे या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारी संस्थांना गहू विक्री करण्याचा अातापर्यंतचा नवा विक्रम बनवला आहे. पंजाब सरकारने १० एप्रिल ते १३ मे या ३४ दिवसांमध्ये १३० लाख मेट्रिक टन गहू खरेदीचे लक्ष्य ठेवले हाेते त्यालाच महिला शेतकऱ्यांनी मागे टाकले आहे.

Advertisement

पेरणीच्या वेळी सुमारे १६.५ लाख शेतकरी म्हणजे कुटुंबातील निम्मे सदस्य दिल्लीच्या सीमेवर अांदाेलनात असताना त्यांच्या पत्नींनी अाणि मुलांनी गव्हाच्या पेरण्या केल्या. पेरणीच्या वेळी लाॅकडाऊनमुळे रासायनिक खताचा तुटवडा असताना पेरणीस उशीर झाला. उष्णता, वादळ, पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकरी गव्हाला पाणी देण्यास असमर्थ असतानाही गव्हाच्या खरेदीत पंजाबने सर्वाधिक विक्रम नोंदवला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply