Take a fresh look at your lifestyle.

टेंशनच की.. शिळे अन्न खाणे टाळा; कारण ब्लॅक अँड व्हाईटनंतर आलीय येलो बुरशीही..!

दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असलेल्या भारतावर काळ्या म्युकरमायकोसीस बुरशीचा हल्ला झालेला आहे. अनेक ठिकाणी या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असतानाच बिहारमध्ये पांढऱ्या बुरशीचे रुग्ण सापडल्याने डोकेदुखी वाढली होती. आता तर, उत्तरप्रदेश राज्याच्या गाजियाबाद जिल्ह्यात पिवळ्या बुरशीचा एक रुग्ण सापडला आहे. डॉक्टरांच्या मते येलो फंगल इन्फेक्शन ब्लॅक अँड व्हाईट बुरशीपेक्षा जास्त धोकादायक आहे.

Advertisement

येथे ज्या रुग्णात यलो फंगस आढळला आहे तो 34 वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी तो कोरोनाच्या संक्रमणातून बरे झाला होता. हा रुग्णदेखील मधुमेहाने त्रस्त आहे. हा रुग्ण गाझियाबादमधील खासगी क्लिनिकमध्ये डॉक्टरांना भेटायला गेल्यावर तपासणी दरम्यान डॉक्टरांना असे दिसून आले की त्याला पिवळ्या बुरशीची लागण झाली आहे. डॉ. बी.पी. त्यागी यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे. या बुरशीबाबतचे मुद्दे असे :

Advertisement
  • रुग्णाला सुस्तपणा आला होता. भूक कमी लागत होती. वजन कमी झाले होते.
  • रुग्णाला अस्पष्ट दिसण्याचीही समस्या असते.
  • पिवळ्या बुरशीचे संक्रमण शरीराच्या आतील अवयवामध्ये वाढत जाऊन हा रोग अधिक प्राणघातक होतो.
  • डॉक्टर म्हणाले की जर घरामध्ये जास्त आर्द्रता असेल तर रुग्णाला घातक ठरू शकते.
  • घरातील जास्त ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीचे प्रमाण वाढते.
  • घर आणि परिसरातील स्वच्छता अशावेळी खूप महत्वाची आहे.
  • शिळे अन्न खाऊ नका.

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply