Take a fresh look at your lifestyle.

खरंच आहे का अॅपलपेक्षा सॅमसंग भारी; पहा नेमका काय दावा आहे आणि युझर्स काय म्हणतात त्यावर

पुणे : मोबाइल मार्केटमध्ये चीनी कंपन्यांना टक्कर देतानाचा त्यांना जगभरात धोबीपछाड करणाऱ्या अॅपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा तीव्र आहे. त्यासाठी अमेरिकन मार्केटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सॅमसंगने अनेकदा अॅपलशी बरोबरी करून दाखवली आहे. सध्या अॅपलने स्मार्टफोन अपग्रेड करण्याचे आवाहन करीत iPhone 12 Pro Max हे नवे व्हर्जन मार्केटमध्ये आणले आहे. त्यावर कडी म्हणून साउथ कोरियन कंपनी सॅमसंगनेही आपलाच Samsung Galaxy S21 Ultra बेस्ट असल्याचा दावा करणारी जाहिरात आणली आहे.

Advertisement

सॅमसंगने अमेरिकेत नवीन कमर्शियल टीव्ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तसेच कंपनीने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही ही जाहिरात शेअर केली आहेत. या अ‍ॅडमध्ये, सॅमसंगने आपला नवीनतम हाय-एंड फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस 21 अल्ट्राची तुलना आयफोन 12 प्रो मॅक्सशी केली आहे. एस 21 अल्ट्रामधून घेतलेले फोटो आणि कॅमेरा वैशिष्ट्ये या अ‍ॅडमध्ये हायलाइट केली गेली आहेत आणि आयफोनमधून घेतलेल्या फोटोंच्या तुलनेत ते उत्कृष्ट असल्याचा दावा यात आहे.

Advertisement

(4) Galaxy S21 Ultra: 108 MP | Samsung – YouTube

Advertisement

‘Your phone upgrade shouldn’t be a downgrad’ असे म्हणून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. चीज सँडविचचे व्हिडिओ फोटोशूट करून दोन्ही मोबाइल फोनमधील बदल अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आयफोन 12 प्रो मॅक्सपेक्षा अधिक तपशीलसह गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा क्वालिटी देत असल्याचे त्यात दाखवले आहे. 108 मेगापिक्सल रिझोल्यूशन सेन्सरमुळे बेस्ट क्वालिटी फोटोशूट शक्य असल्याचे सॅमसंगने म्हटले आहे. दुसर्‍या एका जाहिरातीत दोन्ही मोबाइलच्या कॅमेराची झूम टेस्ट केली गेली आहे. आयफोन कमी असल्याचा दावा आहे. गॅलेक्सी एस 21 अल्ट्राच्या मागील बाजूस 100x झूम लेन्स आहेत. आयफोनमध्ये देण्यात आलेल्या 12x भिंगाशी त्याची तुलना केली गेली आहे. त्यात नवीन सॅमसंग जाहिरातींमध्ये गॅलेक्सी एस 21 अल्ट्राचे बेस्ट असल्याचा दावा केला आहे.

Advertisement

यावर हजारो युझर्स आपले मत व्यक्त करीत आहेत. काहींनी यात सॅमसंगला चांगले म्हटले आहे, तर अॅपल लव्हर्सने त्याच्या नेमके उलट मत व्यक्त केले आहे. एका युझरने दोन्हीमधील फरक सांगताना म्हटले आहे की, आयफोन रिअलस्टिक अनुभव देते, तर सॅमसंग हे इन्स्टाग्राम रेडी पिक्चर्ससाठी उत्तम आहे. आणखी एकानेही असेच म्हटले आहे. सँडविचचे वास्तव दाखवणारे फोटो आयफोनमध्ये दिसतात, तर आपल्याला पाहायला आवडणारे फोटोशूट सॅमसंग मोबाइलवर शक्य आहे. काहींनी सॅमसंगची क्वालिटी उत्तम असल्याचे म्हटलेले असतानाच सॉफ्टवेअर अपडेट आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply