Take a fresh look at your lifestyle.

ट्विटर इंडिया प्रकरण : म्हणून दिल्ली पोलिसांनाही दरवाजा वाजवत मागे फिरावे लागले..!

दिल्ली : ‘COVID-19 टूलकिट’ प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. आता हा मुद्दा भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा न राहता थेट केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर इंडिया असाच झाला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी गुरूग्राम येथील ट्विटर इंडियाच्या कार्यालयावर छापा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ट्विटर कार्यालयाचे सर्व काम वर्क फ्रॉम होम चालू असल्याने फ़क़्त दरवाजा वाजवूनच पोलिसांना मागे फिरावे लागलेले आहे.

Advertisement

NDTV News feed on Twitter: “Delhi Cops At Twitter Office Amid Row Over “Congress Toolkit” Tweet https://t.co/Ghq6cyQWN3 https://t.co/6EEmVZAZGe” / Twitter

Advertisement

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नवभारत टाईम्स यांना म्हटले आहे की, स्पेशल सेलच्या दोन टीम दिल्लीतील लाडो सराय आणि गुडगाव येथे ट्विटर इंडियाच्या कार्यालयात हजर आहेत. हे ‘टूलकिट्स’ या खटल्याच्या तपासाशी संबंधित प्रकरण आहे. दिल्ली पोलिस स्पेशल सेलने टूलकिट’ संदर्भातील तक्रारीच्या तपासासंदर्भात ट्विटरला नोटीस पाठविली आहे. भाजप नेते खासदार संबित पात्रा यांच्या ट्विटवर मैनिपुलेटेड मीडिया म्हणून म्हटले गेल्याच्या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी ट्विटर इंडियाला नोटीस बजावत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. त्यावर ट्विटरने म्हटले आहे की, अशी माहिती देणे बंधनकारक नाही. स्पेशल सेलने ट्विटर इंडिया अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यालयाचा दरवाजा उघडला न गेल्याने पोलीस टीमला परत जावे लागले.

Advertisement

संबित पात्रा यांनी 18 मे रोजी आपल्या ट्विटमध्ये काही कागद शेअर केले होते. ज्यात कॉंग्रेस पक्षाचे लेटरहेड होते. सोशल मीडियावर ट्विट आणि माहिती शेअर करण्याचे वेळापत्रक आणि मार्गदर्शन त्यात होते. यावर सर्व भाजप नेते कॉंग्रेसवर तुटून पडले  होते. दुसरीकडे कॉंग्रेसने त्याबद्दल ही माहिती खोटी असल्याची तक्रार दिली होती होती. त्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ठोस कार्यवाहीची कॉंग्रेस पक्ष वाट पाहत आहे. त्यातच आता ही कारवाई झाल्याने हे प्रकरण ट्रेंडमध्ये आलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply