Take a fresh look at your lifestyle.

‘मायक्रोसॉफ्ट’च्या ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ची सेवा बंद होणार.. पाहा कशामुळे आलीय ही वेळ..?

इंटरनेट.. आधुनिक जगाचे अविभाज्य अंग. कोणतीही माहिती एका क्षणात उपलब्ध करून देणारे एक मायाजालच.. त्याचाच एक भाग असणारे ‘मायक्रोसॉफ्ट’ (Microsoft)चे ‘इंटरनेट एक्सप्लोरर’.. (Internet Explorer)

Advertisement

हे ‘वेब ब्राउझर’ (Web Browser) आपल्या 26 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे. म्हणजे पुढील वर्षी 15 जून 2022 नंतर ते इतिहासजमा झालेले असेल. त्याची जागा मग ‘मायक्रोसॉफ्ट एज’ (microsoft edge) घेणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

Advertisement

‘मायक्रोसॉफ्ट’ने १६ ऑगस्ट १९९५ रोजी ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ हे ब्राउझर सुरु केले. इंटरनेटचे सगळे जगच या ब्राऊजरने बदलून टाकले. हे ब्राऊजर सुरू झाले, तेव्हा इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मर्यादित होती. या ब्राउझरमुळे अनेक कामे सुलभ झाली, तशी त्याची लोकप्रियता वाढली.

Advertisement

बाजारात आज अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media platform) आले आहेत. मात्र, आजही काही सरकारी संस्था, आर्थिक संस्थांमध्ये याच ‘इंटरनेट एक्सप्लोरर’चा उपयोग केला जात आहे. त्याची सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 वर्षांत ते 95 टक्के यूजरपर्यंत पोहोचले होते. आता त्याचे युजर्स 10 टक्केदेखील राहिलेले नाहीत.

Advertisement

2002 मध्ये ‘मॉझिला फायरफॉक्स’ (Mozilla Firefox) सुरू झाले. त्यामुळे हळूहळू ‘एक्सप्लोरर’ची लोकप्रियता घटत गेली, तरी ‘एक्सप्लोरर’चे युजर्स 50 टक्के होते. मात्र. त्यानंतर 2008 मध्ये ‘गुगल क्रोम’ आले नि त्याने जणू ‘एक्सप्लोरर’ला कालबाह्यच ठरविले. जगभरात आज सर्वाधिक युजर्स हे ‘गुगल क्राेम’ (Google chrome)चेच आहेत.

Advertisement

‘वेब ब्राऊजर’चे वापरकर्ते (टक्केवारी)

Advertisement
  • गूगल क्रोम………….. 67.63
  • मोझीला फायरफॉक्स 10.97
  • इंटरनेट एक्सप्लोरर…..7.02
  • अॅपल सफारी…………5.13
  • माइक्रोसॉफ्ट एज……..4.24
  • ओपेरा…………………..2.48

जगभरातील संगणक, लॅपटॉपमध्ये आजही ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ दिसते. मात्र, ‘गुगल क्रोम’, ‘मोझिला फायरफॉक्स’प्रमाणे ‘इंटरनेट एक्सप्लोरर’मध्ये बदल करण्यात आले नाहीत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply