Take a fresh look at your lifestyle.

आणि मोदींचे ‘अकार्यक्षम मॉडेल’ उघडे पडले; काँग्रेसने वेधले त्याकडे लक्ष

मुंबई : भाजपने ज्या ‘गुजरात मॉडेल’चा डंका पिटवून देशातील सत्ता काबीज करण्यात यश मिळवले. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जिथल्या विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागितले, त्याच ‘अकार्यक्षम मॉडेल’ला आता माध्यमांनी उघडकीस आणले आहे. करोनाच्या निमित्ताने गुजरातचे ‘अकार्यक्षम मॉडेल’च आता देशापुढे उघड पडले आहे. गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत गुजरात राज्य सरकारला खडे बोल सुनावले असल्याच्या मुद्द्याकडे कॉंग्रेस पक्षाने लक्ष वेधले आहे.

Advertisement

याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय पॅनल प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुजरातमध्ये कोरोनाची दुसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याने प्रसारमाध्यमांनी खरी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाडे काढल्याने यावर न्यायालयानेही भाष्य केले आहे. तीच परिस्थिती उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यामध्ये आहे.

Advertisement

अनंत गाडगीळ यांनी पुढील मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे :

Advertisement
  • कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बंगळुरू शहरात महापालिकेला एकूण १३ पैकी आता ७ स्मशानभूमी या ‘कोरोना मृतांसाठी राखीव’ ठेवाव्या लागल्या आहेत.
  • उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात सामुदायिकरीत्या शेकडो प्रेतांना अग्नी दिला जात असल्याची छायाचित्रेच परदेशी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्याने सगळे उघडे पडले आहे.
  • पवित्र गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उत्तरप्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’ बनत चालले आहे.
  • राज्यांतर्गत परिस्थितीच्या सर्वेक्षणानंतर भाजपची सरकारे असलेल्या राज्यातच ‘मोदी मॉडेलचा फज्जा’ उडाला आहे.
  • आता आत्मपरीक्षण करण्याची गरजअसून मगच या संकटावर मात करणे शक्य आहे.

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply