Take a fresh look at your lifestyle.

तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी वाटतेय तर वाचा केंद्र सरकारने काय म्हटलेय ते..

दिल्ली : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांच्या एकूण संख्येत मुलांची संख्याही जास्त राहण्याची शक्यता अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी रविवारी याबाबत म्हटले आहे की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत मुलांमध्ये फारच कमी संक्रमण दिसले आहे. त्यामुळे असे वाटत नाही की कोविडच्या तिसर्‍या लाटेत मुलांमध्ये जास्त प्रमाणात संसर्ग होईल.

Advertisement

बर्‍याच तज्ञांनी असा अंदाज लावला आहे की, तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका मुलांना होऊ शकतो. तथापि, एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले की, तज्ञांनी अशा प्रकारची शंका व्यक्त करण्यासाठी काही गोष्टींना आधार बनविला आहे. उदाहरणार्थ, पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत मुलांना विशेष होत त्रास नाही. त्यामुळे त्यांना लस दिली जात नाही. अशा परिस्थितीत जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा ते सर्वात असुरक्षित असू शकतात. मात्र, यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही.

Advertisement

त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, कोविडचे रुग्ण भारतात 15 दिवसांपासून झपाट्याने कमी होत आहेत. तिसर्‍या लाटेचा मुलांवर गंभीर परिणाम होईल, असे अद्याप कोणतेही स्पष्ट चिन्ह दिसलेले नाही. मुले व तरुणांवर या साथीच्या आजाराच्या परिणामाबद्दल बोलताना गुलेरिया यांनी म्हटले आहे की, उलट साथीच्या आजाराच्या काळात मुले मानसिक ताणतणाव सहन करीत आहेत. स्मार्टफोनचे व्यसन आणि शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाताना मुलांना जास्त त्रास होत आहे. त्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply