Take a fresh look at your lifestyle.

हॅट्स ऑफ..! कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही 60 वर्षांपर्यंत कुटुंबास ‘फुल्ल’ पगार.. पहा कोणत्या कंपनीने घेतलाय ‘हा’ निर्णय..?

मुंबई : कोरोनाचा कहर सुरु असतानाही अनेक कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. कंपनीचं उत्पादन सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसाठी कंपन्याही विविध सुविधा पुरवीत आहेत. मात्र, त्यानंतरही काही कर्मचाऱ्यांना कोरोनानं आपल्या दाढेत ओढलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याचे कुटुंब उघड्यावर येऊ नये, यासाठी काही कंपन्यांनी अशा कुटुंबाचीही जबाबदारी घेतली आहे. त्यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे, टाटा स्टील..

Advertisement

आपल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टील (Tata Still) व्यवस्थापनानं मोठा निर्णय घेतला आहे. टाटा स्टील व्यवस्थापनाने तसे परिपत्रकच जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे, की “कोरोना (corona) काळात ‘टाटा स्टील’ आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपण सर्व जण उत्तम भविष्य निर्माण करु शकतो. सामाजिक सुरक्षेतंर्गत ‘टाटा स्टील’ आपल्या कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी शक्य ती पावलं उचलणार आहे.”

Advertisement

कोविड-19मुळे कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर कर्मचाऱ्यांच्या 60 वर्षांपर्यंतचा पगार (Salary) त्याच्या कुटुंबियांना ‘टाटा स्टील’ देणार आहे. मृत्यूपूर्वीच्या महिन्यात कर्मचाऱ्याला जो पगार मिळाला असेल, तेवढाच पगार वयाच्या 60 वर्षांपर्यंत त्याच्या वारसदाराला मिळणार आहे. कर्मचाऱ्याला कंपनीकडून राहण्यासाठी घर दिले असेल, तर कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत त्याच्या कुटुंबास त्या घरात राहता येईल, तसेच कर्मचाऱ्याच्या वारसदाराला सर्व वैद्यकीय सुविधांचा लाभही घेता येणार आहे.

Advertisement

कंपनीनं ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ (Front line workers) साठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्तव्य बजावताना एखाद्या ‘फ्रंटलाईन वर्कर’चा मृत्यू झाला, तर कंपनी व्यवस्थापन त्याच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

Advertisement

टाटा स्टील कंपनी व्यवस्थापन नेहमीच आपले कर्मचारी आणि भागधारकांच्या हितासाठी काम करते. कोविडच्या साथीतही ‘टाटा स्टील’ आपल्या कर्मचार्‍यांची काळजी घेत आहे. टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे, जी आठ तास काम, नफा-आधारित बोनस, सामाजिक सुरक्षा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचार्‍यांना प्रसूती रजा लागू करते. जे नंतर देशातील इतर कंपन्यांनी स्विकारलं.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply