Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा दुहेरी लाभ मिळणार.. कसा ते तुम्हीच पहा..!

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्‍यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते. प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे तीन हप्त्यात शेतकऱ्यांना हे पैसे मिळतात. कोरोनाच्या संकटातही मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर पीएम किसान योजनेचा (PM kisan yojana) 8 वा हप्ता ‘ट्रान्सफर’ (Transfer) केला आहे. आतापर्यंत 9.5 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात हे पैसे पोचले आहेत.

Advertisement

दरम्यान, एखाद्या शेतकऱयाच्या खात्यात अजूनही हे पैसे पोहचले नसतील, तरी घाबरण्याचे कारण नाही. पीएम किसान अंतर्गत आतापर्यंत आपले ‘रजिस्ट्रेशन’ (Registration) केले नसेल, तर 30 जूनपूर्वी पूर्ण केल्यास एकदम दोन हप्त्याचा लाभ मिळू शकतो.

Advertisement

असा मिळेल लाभ..
तुम्ही जूनमध्ये अर्ज केला आणि तो स्वीकरण्यात आला, तर जूनमध्ये तुम्हाला 2000 रुपये सहज मिळतील. नंतर ऑगस्टमध्येसुद्धा 2000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात येईल. अद्याप देशातील 11 कोटीपेक्षा जास्त लोकांना पीएम किसानच्या एप्रिल-जुलैच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.

Advertisement

तक्रारीसाठी येथे करा संपर्क

Advertisement
  • पीएम किसान टोल फ्री नंबर- 18001155266
  • पीएम किसान हेल्पलाईन नंबर- 155261
  • पीएम किसान लँडलाईन नंबर- 01123381092, 23382401
  • पीएम किसानची नवीन हेल्पलाईन- 011-24300606
  • पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन – 0120-6025109

नवीन शेतकरी या योजनेत सहभागी झाला, तर सरकार लागोपाठ दोन हप्त्यांची रक्कम मंजूर करू शकते. 30 जूनपूर्वी या योजनेसाठी अर्ज केला, तर एप्रिल-जुलैचा हप्ता जुलैमध्ये मिळेल आणि ऑगस्टचा नवा हप्तासुद्धा खात्यात येईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply