Take a fresh look at your lifestyle.

DRDO च्या औषधाशी आहे डॉ. कलाम यांचेही ‘असे’ कनेक्शन; वाचा महत्वाची माहिती

पुणे : माजी राष्ट्रपती आणि संशोधक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. त्याच डॉ. कलाम यांचे आणि २ डीजी अाॅक्सि डी ग्लुकाेज या करोनावरील औषधाचे कनेक्शन पुढे आलेले आहे. होय, मिसाइल मॅन अब्दुल कलाम यांनी ग्वाल्हेरच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटला (डीअारडीआय) यांना हे औषध बनवण्याचे लक्ष्य दिलेले होते.

Advertisement

डॉ. कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट‌्यूट अाॅफ न्यूक्लिअर मेडिसिन अंॅड अलाइड सायन्सने (एन्मास) २५ वर्षांपूर्वी कर्कराेगावरील उपचारासाठी हे अाैषध तयार करण्यासाठीचे काम सुरू केले होते. त्यालाच आता करोना काळात फळ आलेले आहे. नंतर ब्रेन ट्यूमरच्या उपचारावर याच माॅलेक्यूलसाठी जर्मनीनेदेखील ‘एन्मास’ संस्थेला एक प्रकल्प दिला होता. अाता या अाैषधाचे परीक्षण काेराेना रुग्णावर करण्यात अाले असून त्यात यशही मिळाल्याने त्याचा वापर करणे सुरू झालेले आहे.

Advertisement

डीअारडीआयचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डाॅ. करुणा शंकर पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १९९६ मध्ये इन्स्टिट्यूट अाॅफ न्यूक्लिअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सने एम्स, नवी दिल्ली अाणि केएमअायअाय बंगळुरू येथे क्लिनिकल चाचण्या सुरू असताना अमेरिकेच्या अाैषध उद्याेगाकडून माॅलेक्यूलचा पुरवठा बंद करण्यात आला. चाचण्या थंडावल्याने जैन यांनी संघटनेचे महासंचालक डाॅ. अब्दुल कलाम यांच्यासमाेर ही समस्या मांडल्यावर त्यावर तोडगा निघाला. डाॅ. स्वामी यांच्याशी बाेला, ताेडगा सापडेल. त्यानंतर स्वामी हा प्रकल्प घेऊन ग्वाल्हेरला अाले अाणि डाॅ. करुणा शंकर पांडे यांच्याकडे प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली होती.

Advertisement

काेराेना विषाणूवरील उपचारासाठी सध्या उपयाेगात अाणले जात असलेले २ डीजी अाॅक्सि डी ग्लुकाेज याला अायसीएमअारकडून तसेच अाैषध नियंत्रकांकडूनदेखील परवानगी घेतली व नंतर या प्रक्रियेचे पेटंट मिळाले आहे. आता तेच औषध करोन रुग्णांना प्राणवायू संजीवनी देणारे ठरणार आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply