Take a fresh look at your lifestyle.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तब्बल १७० जन बेपत्ता; पहा कुठे घडली ही दुर्घटना

लंडन : करोनाचा मार सहन करणाऱ्या जगासाठी हे वर्ष सुद्धा संकटेच घेऊन आले आहे. करोना तर आहेच. या संकटाच्या जोडीला नैसर्गिक संकटांनीही जोरदार आक्रमण केले आहे. कधी कोणत्या देशात चक्रीवादळे येतात, तर कुठे बर्फ वितळू लागतो, कडाक्याच्या उन्हाळ्यात मुसळधार पाऊस होतो तर कुठे खायला अन्न सुद्धा मिळत नाही इतका भीषण दुष्काळ पडतो. जगातील संकटांची यादी वाढतच आहे, यामध्ये आता ज्वालामुखीच्या संकटाची भर पडली आहे.

Advertisement

कांगो या देशातील गोमा या शहरा जवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीच्या लाव्हारसामुळे येथे अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत, तसेच काही लोकांना प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे. युनिसेफने याबाबत म्हटले आहे, की ज्वालामुखी माऊंट नीरागोंगोचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांनी रवांडा या देशात आश्रय घेतला आहे. या भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. सरकारी प्रवक्त पैट्रीक मुयाया यांनी सांगितले, की २२ मे रोजी झालेल्या एका विस्फोटात जवळपास १५ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातून बाहेर पडण्यासाठी लोकांची धावपळ सुरू होती. या धावपळीतच ट्रकच्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला. या क्षेत्रात आणखीही नुकसान होण्याची शक्यता आहे. या संकटानंतर येथे १७० पेक्षा जास्त मुले बेपत्ता झाली आहेत. या मुलांना शोधण्यात येत आहे.

Advertisement

या भागात याआधी सन २००२ मध्येही अशीच दुर्घटना घडली होती. तेव्हाही हजारो घरे बेचिराख झाली होती. शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा अशाच नैसर्गिक संकटाने हाहाकार उडाला आहे. आता लाव्हारस वाहणे थांबले आहे. मात्र, या संकटाने जे नुकसान केले आहे ते स्पष्ट दिसत आहे. आफ्रिका खंडातील देश अनेक संकटांनी घेरलेले आहेत. या भागातच सर्वात मोठे वाळवंट आहे. दुष्काळाची समस्या येथे कायमच जाणवते. त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकाच्याही घटना येथे घडत असतात. एकूणच जगासाठी सध्याची परिस्थिती वाईटच म्हणावी लागेल. करोना संकटाच्या काळात नैसर्गिक संकटे येत असल्याने आव्हानात्मक परिस्थिती आहे. करोना संकटाचे थैमान अजूनही सुरूच आहे. त्यातच काही देशांना या नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. भारतात करोनाचे संकट वाढत आहे. या बरोबरच देशात चक्रीवादळे येत आहेत. तौक्ते वादळानंतर आता यास चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply