Take a fresh look at your lifestyle.

म्हणून टाटा ग्रुपचा ‘तो’ शेअर करू शकेल आपल्याला मालामाल; पहा नेमके काय म्हणतात बाजार विश्लेषक

मुंबई : सध्या शेअर बाजारातील तेजी जोरात आहे. त्यात पैसे गुंतवणूक करून आणखी जास्त पैसे कमावण्यासाठी चांगल्या आणि सक्षम कंपन्यात गुंतवणूक करण्याच्या सूचना बाजार विश्लेषक व ब्रोकरेज फर्म करीत आहेत. त्यामध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला 17 ब्रोकरेज फर्मने दिला आहे. तर, 3 संस्थांनी आहे ते शेअर होल्ड करणे आणि एकानेच विकण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisement

एकूण सध्याची परिस्थिती लक्षात घेता टाटा पॉवर (Tata Power) कंपनी सुस्थितीत आहे. तसेच भविष्यात कंपनीकडे चांगली परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. या कंपनीने 2050 पर्यंत झिरो कार्बन इमिशनचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच इतर अनेक प्रकल्पही हाती घेतले आहेत. त्याबाबतचे मुद्दे असे :

Advertisement
 1. जेनरेशन, ट्रांसमिशन, डिस्ट्रिब्यूशन आणि ईपीसी (engineering, procurement and construction) यामध्ये कंपनीची गती जोरात आहे
 2. ओडिशा डिस्ट्रिब्यूशन सर्किल (Odisha distribution circle) यांचे कंपनीने नुकतेच अधिग्रहण केले आहे
 3. सोलर ईपीसी प्रोजेक्ट्स (Solar EPC projects) पूर्ण होण्यासह ओडीसा राज्यात रिटेल पावर डिस्ट्रिब्यूशन (retail power distribution) याचे चार परवाने भेटल्याने आता कंपनीची ग्राहकसंख्या 1.2 कोटी झाली आहे
 4. कोल डिविजन (coal division) आणि इतर लाभ लक्षात घेता कंपनीला 53 टक्के जास्त रेव्हेन्यूवाढ झाली आहे
 5. एनटीपीसी (NTPC) कंपनीसह सध्या टाटा पॉवरकडे तब्बल 8,740 कोटी रुपयांचे कंत्राट आहेत
 6. इलेक्ट्रिक वाहनाच्या (Electric vehicle) सेक्टरमध्ये ही कंपनी होम चार्जिंग सुविधा (Home charging Facility) आणण्यासाठी प्रयत्नशील आहे
 7. कंपनीची वीज उत्पादन क्षमता 12.8 गिगावॉटपर्यंत आहे
 8. सध्या एकूण विजेच्या उत्पादनात तब्बल 30 टक्के वाटा अपारंपरिक उर्जास्त्रोताचा आहे
 9. रिन्यूएबल डिविजन याच्या निर्गुंतवणूक करून 3,500 कोटी रुपये मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे
 10. वर्ष 2020-21 मधील चौथ्या तिमाहीचे रिझल्ट्स चांगले आहेत

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply