Take a fresh look at your lifestyle.

3F ट्रिक : म्हणून झुनझुनवालांनी कमावलाय इतका पैसा; पहा हर्षद मेहताबद्दल नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : जगात वॉरेन बफे (Warren Buffett) आणि भारतात म्हणाल तर राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala)  हे अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. होय, गुंतागुंतीच्या शेअर बाजारात (Stock Market) पैसे लावून त्याद्वारे खोऱ्याने पैसे ओढण्यात या दोघांनी आपली जिंदगी घातली आहे. आताही त्यांनी भारतीय शेअर बाजारात पैसे कमावण्याचे आणि त्याद्वारे श्रीमंतीचे महाद्वार खुले करण्याच्या नियमांबद्दल सांगितले आहे. शेअर बाजारात पैसे कमावण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी हे खूपच महत्वाचे आहे की..

Advertisement

अगोदर आपण त्यांच्या 3F ट्रिक याबद्दल पाहूया. फेयर वैल्युएशन (Fair Valuation), फंडामेंटल (Fundamental) आणि फ्यूचर (Future) याला 3F ट्रिक (3 F Trick) म्हणतात. तसेच त्यांनी पुढे आणखी काही महत्वाचे मुद्देही सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचा म्हणजे बिजनेसवरील विश्वास आणि मार्केटमधील (Indian Market) बदलांचा योग्य पद्धतीने अभ्यास करून बांधलेले आडाखे. 1985 पासून झुनझुनवाला शेअर बाजारात गुंतवणूक करून मालदार पार्टी बनले आहेत. भारतीय शेअर बाजाराच्या ग्रोथ स्टोरीवर त्यांचा विश्वास आहे. बाजारपेठ हाच सर्वोच्च राजा आहे आणि ते वास्तव सर्वांनी स्वीकारला पाहिजे. आपण त्याचे योग्य पद्धतीने अनुसरण करून त्यापासून धडा घ्यावा. या मार्केटमध्ये स्वत:ला किंगमेकर म्हणायचे असे बरेच लोक आर्थर रोड कारागृहात बंद आहेत. यावेळी बाजारात हर्षद मेहता (Big Bull Harshad Mehata) कोणीही नाही. हे मुद्दाम गतिमान केले जात नाही. त्यामुळे सध्याचे असे आरोप पूर्ण बकवास आहेत.

Advertisement

सध्याची भारतीय बाजाराची दोलायमान परिस्थिती कायम राहणारी नसून मार्केट स्थिर होण्याचा विश्वास झुनझुनवाला यांनी आज तक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्टार्टअप (Start Up Business) बिझिनेस अंदाजावर कार्यरत असतो. जर 1000 घोडे शर्यतीत धावत असतील तर त्यापैकी फ़क़्त 10 घोड्यावर पैज लावता येऊ शकतात. स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एका संस्थेची आवश्यकता आहे. मात्र, सध्याच्या मूल्यांकनावर मी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. कोविड 19 हा फ्लू आहे. तो काही कर्करोग नाही. याचा परिणाम कंपनीच्या कामकाजावर चतुर्थांश किंवा दोन तिमाहीपर्यंत होऊ शकतो. परंतु, यामुळे गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपर्यंत त्या कंपनीपासून दूर जाऊ नये.

Advertisement

सध्या करोना लॉकडाऊन व कडक निर्बंधाच्या काळात हॉस्पिटॅलिटी (Hospitality / आदरातिथ्य), विमान वाहतूक (aviation) व हॉटेल (hotel) उद्योगाला सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र, भविष्यात याच सेक्टरमधून अनेकांना मोठा पैसा मिळण्याची शक्यता असल्याचे झुनझुनवाला यांनी म्हटले आहे. ही परिस्थिती आणखी काही महिने राहील. सध्या करोनामुळे मार्केटमध्ये बदल झालेले आहेत. मात्र, ही परिस्थिती सुधारण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply