Take a fresh look at your lifestyle.

वढ पाचची..! लग्नाची वरात, पोलिसांच्या दारात.. पाहा ब्बाॅ.. दारूमुळे काय राडा झाला..?

नवी दिल्ली : लग्नाच्या वरातीत दारू पिऊन गोंधळ घालणारे आपण अनेकदा पाहतो. मात्र, शुभ कार्यात विघ्न नको, या उद्देशाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.

Advertisement

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)मध्ये एका लग्नात दारूवरुन असाच राडा झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी थेट पोलिस ठाणं (Police station) गाठलं. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या नवरदेवानं मुलीच्या गावात पायसुद्धा ठेवणार नाही, असा इशारा दिला. अखेर पोलिस ठाण्यातच हा विवाह लावण्यात आला.

Advertisement

उत्तर प्रदेशामधील शाहजहापूर येथील रामचंद्र मिशन पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या परिसरातील एका तरुणीचा विवाह खुदागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिरिया येथील कमलेश वर्मा याच्यासोबत ठरला होता. त्यानुसार २१ मे रोजी रात्री कमलेशची वरात मुलीच्या गावी आली.

Advertisement

विधी संपन्न होत असताना, नवरदेवाचे नातेवाईक दारूच्या नशेत झिंगले होते. मुलीकडच्या नातेवाईकांनीही दोन-चार पेग रिचवले. दारूच्या नशेत तर्र झालेल्या दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये सुरवातीला किरकोळ झाला. त्याचे पर्यावसन काही वेळातच हाणामारीत झालं.

Advertisement

काही केल्या वाद थांबत नसल्याचं पाहून नवरदेव सात फेरे घेण्यापूर्वीच मंडपाबाहेर पडला. त्याचे नातेवाईकही हळूहळू गावाबाहेर आले. वरात माघारी चालल्याचं पाहून मुलीच्या वडिलांनी थेट रामचंद्र मिशन पोलिस ठाणं गाठलं. त्यानंतर मुलाकडची मंडळीही पोलिस ठाण्यात आली. पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, “मुलीच्या गावात माझ्या जीवाला धोका आहे” असं सांगून नवरदेवानं परत गावात जाण्यास नकार दिला.

Advertisement

अखेर पोलिस ठाण्यातच लग्न लावण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दर्शवली. त्यानंतर पोलिस आणि नातेवाईकांच्या साक्षीनं पोलिस ठाण्यातच हा विवाह सोहळा संपन्न झाला.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply