Take a fresh look at your lifestyle.

स्वामी रामदेव यांच्या पतंजलीच्या डेअरी युनिटचे हेड बंसल यांचे निधन; करोना झाल्यामुळे होते आजारी

मुंबई : एकीकडे आयुर्वेदिक बेस्ट की अॅलोपॅथिक औषधे यावरून भारतात रणकंदन चालू असतानाच देशभरात रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचवेळी पतंजली समूहाचे सर्वेसर्वा आणि योगगुरू स्वामी रामदेव (Yoga guru baba Ramdev) यांनी अॅलोपॅथिक औषधे वापरल्याने हजारो मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी पतंजली समूहाच्या डेअरी युनिटचे मुख्य सुनील बंसल (Sunil Bansal) यांचे करोनामुळे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी आलेली आहे.

Advertisement

57 वर्षांचे बंसल यांनी 2018 मध्ये पतंजलीच्या डेअरी व्यवसायाची सूत्रे हाती घेतली होती. डेअरी सायन्स (Dairy science Business) या विषयातील तज्ञ असलेल्या बंसल यांनी पतंजलीचे दुध, दही, बटर मिल्क यासह अनेक उत्पादने (Packaged milk products) बाजारात आणली. मागील आठवड्यात बंसल यांना कोविड 19 आजार झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यात त्यांचे फुफ्फुस खराब झाल्यानंतर ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नवभारत टाईम्सने म्हटले आहे.

Advertisement

Shekhar Gupta on Twitter: “Sunil Bansal, CEO of Baba Ramdev’s Patanjali Dairies, dies of ‘Covid complications’ @ChandnaHimani reports for ThePrint https://t.co/BjDfuKsiX5” / Twitter

Advertisement

त्याचवेळी बाबा रामदेव यांना आपल्या 140 सेकंदाच्या क्लिपवरून माफी मागण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी त्यात अॅलोपॅथिक औषधे वापरल्याने हजारो मृत्यू झाल्याचा दावा केला होता. त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian medical Association) तक्रार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कारवाईची मागणी केली होती.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply