Take a fresh look at your lifestyle.

सकारात्मक बातमी : सैनिकाची कमाल; २१ स्कोअर असतानाही ‘त्या’ उपचाराद्वारे ६५ वर्षीय आईला केले करोनामुक्त..!

सोलापूर / उस्मानाबाद : करोनावर मात करणे म्हणजे नकारात्मक विचारांना मूठमाती देणे, असाच या विषाणूच्या विरोधात लढण्याचा खरा मूलमंत्र आहे. अनेक भारतीय नागरिकांनी सरकारच्या आरोग्य व्यवस्थेच्या कृपेने हे सिद्ध करून दाखवले आहे. आताही एका भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या तरुणाने आपल्या आईला शेतातल्या लिंबाच्या झाडाखाली योग्य पद्धतीने उपचार देऊन करोनामुक्त करून दाखवले आहे. हे उदाहरण अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे.

Advertisement

भारतीय सैन्य दलात असलेले रामहरी यादव सुटीवर आलेले असताना त्यांच्या आई बालिका यादव (वय ६५ वर्षे) यांना ताप, अंगदुखी, सर्दी अशी लक्षणे सुरू झाली. मग त्यांची करोना चाचणी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात जाऊन केलेल्या कोरोना टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. सिटीस्कॅन स्कोअर २१ आल्यावर तर चिंतेत आणखी भर पडली. रुग्णालयात भरती करण्यासाठी धावपळ करूनही शहरातील सरकारी व खासगी कोविड सेंटरमध्ये कुठेही बेड मिळाला नाही. मग कळंब येथील एका डॉक्टराने औषध आणि पथ्यपाणी याचा सल्ला रामहरी यादव यांना दिला.

Advertisement

रामहरी यांनी आईला मानसिक आधार आणि औषध दिले. सकारात्मकता हाच मग त्यांच्या आईचा आधार बनला. दररोज सकाळी योगासन केले, अनुलोम-विलोम, कपालभाती, कोमट पाणी पिणे आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या योग्य पद्धतीने घेण्यास त्यांनी सुरुवात केली. शेतातील लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेऊन मग बालिका यादव या आईने करोनाला दणक्यात मूठमाती दिली.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply