Take a fresh look at your lifestyle.

लसीकरण नियमात महत्वाचा बदल; 18 पेक्षा जास्त वय असल्यास ‘तिथे’च होणार ऑनलाईन नोंदणी

दिल्ली : करोना लस घेण्याचे दिव्य काम करणे म्हणजे महापराक्रम करण्यासारखे आहे. कारण, त्यासाठी रात्री रांगेत उभे राहणे किंवा मग मागच्या दाराने सेटिंग लावण्याचे पराक्रम करावे लागत असल्याच्या बातम्या अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. त्यातच ऑनलाईन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत आणि नियम व अटी यामध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत. आताही एक महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे.

Advertisement

होय, जर तुमचे वय 18 वर्षे यापेक्षा जास्त असेल तर आपणास CoWIN या मोबाइल अॅप्लिकेशन किंवा वेबसाईटवर जाऊन नोंदणी न करता थेट लस मिळू शकते. जर, मोबाइलवर पाहिल्यावर लसीकरण स्लॉट उपलब्ध असेल तर, संबंधित व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आपली नोंदणी आणि लसीकरण करू शकतात. सध्या ही सुविधा फ़क़्त सरकारी लसीकरण केंद्रावर उपलब्ध आहे. खासगी लसीकरण केंद्रासाठी ही सुविधा अजूनही उपलब्ध झालेली नाही.

Advertisement

सध्या करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच करोना लस उपलब्ध नसल्याने देशभरात लसीकरण अभियानाचा बोजवारा उडाला आहे. अशावेळी ही एक महत्वाची बातमी आलेली आहे. मात्र, नोंदणी न करता लसीकरण करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि त्यामध्ये होणारी अनागोंदी नियंत्रणात कशी आणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply