Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधीनी मांडलाय ‘तो’ महत्वाचा मुद्दा; पहा काय सल्ला दिलाय मोदी सरकारला

दिल्ली : करोना विषाणूस रोखण्यासाठी आता लसीकरणाशिवाय पर्यायच नाही. लसीकरणानेच हा आजार नियंत्रणात येऊ शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. एवढेच काय तर मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यानंतर इस्त्रायल, अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी निर्बंध सुद्धा कमी केले आहेत. भारतात मात्र परिस्थिती गंभीर आहे. देशाची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणे अत्यंत गरजेचे असताना काही दिवसांपासून मात्र लसीकरण कमी होत आहे. या मुद्द्यावर आता काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत लसीकरणाचा आलेखच दिला आहे. यामध्ये जानेवारी पासून देशात करोना प्रतिबंधक लसीकरण कसे कमी होत गेले याची माहिती त्यांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात ८ कोटी ९८ लाख नागरिकांचे लसीकरण केले होते. त्यानंतर पुढील मे महिन्यात मात्र ३ कोटी ६९ लाख नागरिकांनाच लस दिल्या असल्याचे यात म्हटले आहे. ‘करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावी आहे. मात्र, सरकारला याची चिंताच नाही’, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement

Rahul Gandhi on Twitter: “Vaccination is the key to controlling the pandemic but GOI doesn’t seem to care. https://t.co/iazLYEXHY3” / Twitter

Advertisement

देशात काही दिवसांपासून दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, अजूनही दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. या आजारावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारचे नियोजन अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. लसीकरण वाढवणे गरजेचे असताना काही  दिवसांपासून लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कमी संख्येत लसीकर होत आहे. लसी मिळत नसल्याने अनेक राज्यात लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. त्याचा परिणाम लसीकरणावर झाला आहे.

Advertisement

राज्यांकडून केंद्र सरकारकडे लसींची मागणी करण्यात येत आहे. परंतु, सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसी मिळत नसल्याची राज्यांची तक्रार आहे. याच मुद्द्यावर आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही  केंद्र सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका करत आहेत. नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. लसी मिळत नसल्याने त्यांना लसीकरण केंद्रांवरुन माघारी जावे लागत आहे. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने योग्य नियोजन करुन राज्यांना पुरेशा प्रमाणात लसींचे डोस द्यावेत,अशी मागणी विरोधक करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply