Take a fresh look at your lifestyle.

मॉडर्ना आणि फायजरच्या लसबाबत तापलेय राजकारण; पहा आरोग्याच्या मुद्द्यावर काय चालू आहे दिल्लीत

दिल्ली : करोना प्रतिबंधक लसीकरणावरुन केंद्र आणि राज्यांत सुरू असलेले वाद काही केल्या थांबण्यास तयार नाहीत. लसी मिळत नसल्याने राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी लसीकरण बंद झाल्याने उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. याआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला होता.

Advertisement

सिसोदिया यांनी सांगितले, की फायजर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी करोना प्रतिबंधक लसी थेट दिल्ली सरकारला विकण्यास नकार दिला आहे. या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे, की याबाबत फक्त केंद्र सरकार बरोबर करार करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत. दिल्लीत आजमितीस १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी असलेली ४०० लसीकरण केंद्रे बंद करावी लागली आहेत. तसेच ४५ वर्षांवरील नागरिक, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेले केंद्रे सुद्धा लसी नसल्याने बंद करावी लागली आहेत.

Advertisement

करोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी आज लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लसींसाठी मॉडर्ना, फायजर, जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांना संपर्क केला होता. मात्र, फायजर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी लसी देण्यास नकार दिला आहे. या कंपन्या सध्या केंद्र सरकार बरोबर चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. करोना लस खरेदीतही भारत मागे राहिला आहे. त्यातुलनेत अन्य देशांनी तत्काळ कार्यवाही करत लसी खरेदी केल्या. काही देशांनी तर त्यांच्या लोकसंख्येच्या कितीतरी जास्त लसी घेऊन ठेवल्या आहेत.

Advertisement

केंद्र सरकारने लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मॉडर्ना आणि फायजर कंपन्यांना केंद्र सरकारने तातडीने मंजुरी द्यावी, असे आवाहन सिसोदिया यांनी केले. याआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा केंद्र सरकारने या दोन कंपन्यांच्या लसी खरेदी करुन राज्यांनी वितरीत कराव्या, असे आवाहन केले होते.

Advertisement

केंद्र सरकारकडून लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या तीन दिवसात केंद्र सरकार आणखी ४८ लाख लसींचे डोस राज्यांना देणार आहे. मात्र, राज्यांची मागणी पाहता या लसी कमीच आहेत. देशात अनेक ठिकाणी लसीकरणात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने जास्तीत जास्त लसी उपलब्ध करुन राज्यांना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून लवकर कार्यवाही होत नसल्यानेही यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळेच राज्य आणि केंद्रात या मुद्द्यावर वाद वाढत  चालला आहे. देशात करोनाची परिस्थिती पाहता लसींच्या कमतरतेवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता  आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply