Take a fresh look at your lifestyle.

तर थोड्याच दिवसात सोने ५० हजारांचाही टप्पा करणार पार; पहा आजचे बाजारभाव

मुंबई : भारतात सोन्याला कायमच मागणी असते. सण आहे म्हणून सोने घेतले. पैशांची गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केले, अशी अनेक कारणे देत सोने खरेदी केली जाते. आताही करोनाचे संकट असले तरी सोन्याला मागणी कमी झालेली नाही. त्यामुळेच या संकटाच्या काळातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे सोन्याचे दर आता ४८ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. दरातील तेजी अशीच कायम राहिली तर थोड्याच दिवसात सोने ५० हजारांचाही टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

देशात करोनाचे संकट आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. उद्योग-व्यवसायांनाही फटका बसला आहे. लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे नागरिक जपून पैसे खर्च करत आहेत. तसेच गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यास प्राधान्य देत आहेत. जागतिक बाजारात सुद्धा सोन्याच्या दरात तेजी आहे. या कारणांमुळे देशात सोन्याचे भाव वाढत आहेत. एमसीएक्सवर आज सोन्याचे दर ४८ हजार ५१९ रुपय प्रति दहा ग्रॅम असे आहेत. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एक किलो चांदीचे दर ७७ हजार ४४० रुपये असे आहेत. जागतिक बाजारातही सोन्याचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम देशातही दिसून येत आहे. देशात  काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे.

Advertisement

मागील वर्षी करोना संकटातही अशीच परिस्थिती होती. त्यावेळी तर देशात लॉकडाउन होते. सर्व काही ठप्प होते. तरी देखील सोन्याचे दर वाढतच होते. या काळात सोन्याने ५० हजारांचा टप्पा पार केला होता. यावेळी दुसऱ्या लाटेत मात्र देशात लॉकडाउन नाही. देशातील व्यवहार काही प्रमाणात का होईना पण, सुरू आहेत. तरी सुद्धा सोने आणि चांदीचे दर वाढतच आहेत. दरवाढीचा हा ट्रेंड असाच कायम राहिला तर लवकरच सोने ५० हजारांचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा अंदाज खराही ठरू शकतो.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply