Take a fresh look at your lifestyle.

चीनला बसलाय मोठाच झटका; पहा कोणत्या देशाने उधळवले क्रूर मनसुबे, झालाय तिळपापड..!

दिल्ली : जग करोना संकटाचा सामना करत असताना याचा गैरफायदा घेणाऱ्या चीनची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. चीनच्या उद्योगांनी अनेक देश हैराण झाले आहेत. अमेरिका असो नाहीतर ऑस्ट्रेलिया किंवा जपान या प्रत्येक देशाबरोबर चीनचे वाद सुरू आहेत. ही यादी बरीच मोठी आहे. त्यामुळेच चीनच्या या वाढत्या दादागिरीस प्रत्युत्तर देण्यासाठी काही देश आक्रमक झाले आहेत.

Advertisement

अमेरिकेने तैवानच्या खाडीत जहाज पाठवल्यानंतर असाच प्रकार ब्रिटनने केला आहे. ब्रिटनने त्यांच्या शक्तिशाली नौसेनेचा ताफाच हिंद-प्रशांतच्या दिशेने रवाना केला आहे. या ताफ्यात ३२ एयरक्राफ्टसह ३ हजार ७०० नौसेनिक तैनात आहेत. हा ताफा सात महिने महासागरांची निरीक्षण करणार असून या दरम्यान भूमध्य समुद्र आणि हिंद-पॅसिफीक क्षेत्रात भ्रमण करणार आहे. तसेच ७० पेक्षा जास्त देशांच्या मदतीने युद्धाभ्यास करणार आहे.

Advertisement

ब्रिटनच्या या कार्यवाहीमुळे चीनचा संताप होणार आहे. याआधी अमेरिकेने तैवानच्या खाडीत जहाज पाठवल्यानंतर चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर आता ब्रिटनने चीनच्या दादागिरीस उत्तर देण्यासाठी असेच केल्याने दोन्ही देशांदरम्यान वाद वाढणार आहे. याआधी जपानने काही बेटांवर कब्जा करण्याचे चीनचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सैन्य अभ्यास केला होता. सध्या जपानच्या नियंत्रणात असलेल्या सेनकाकू बेटावर चीन आपला दावा सांगत आहे. याच कारणामुळे जपान आपल्या सैन्य ताकदीत वाढ करत आहे.

Advertisement

जगात करोना संकट आहे. मात्र, चीनला याचा काही फरक पडलेला नाही. करोना विषाणूच्या मुद्द्यावर आधीच चीनची बदनामी झाली आहे. चीन मधूनच करोना जगात पसरल्याचा आरोप अनेक देशांनी केला आहे. मात्र, चीनने आरोप फेटाळून लावले आहेत. आता या संकटाच्या काळात चीन आपल्या योजनांवर वेगाने कार्यवाही करत आहे. त्यामुळे जग सावध झाले आहे. चीनच्या घडमोडीवर जगाचे लक्ष  आहे. तसेच वेळप्रसंगी त्यास प्रत्युत्तर देण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

Advertisement

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटन या देशांनी काही दिवसात चीन विरोधात आक्रमक धोरण स्विकारले आहे. करोनाचा मुद्दा असो किंवा दुसऱ्या देशांच्या जमिनी बळकावण्याचा डाव असो, या मुद्द्यांवर चीनला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या चीन आणि या देशांत तणाव वाढत चालला आहे. आताही ब्रिटनने केलेल्या या कार्यवाहीचे पडसाद निश्चितच उमटणार आहेत. आता चीन यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply