Take a fresh look at your lifestyle.

करोना संकटामुळे बदलला आहे मार्केट ट्रेंड; पहा नेमका कसा बदल झालाय खरेदीच्या वस्तूंमध्ये

मुंबई : करोनाने देशात हाहाकार उडाला आहे. या आजाराने देशाचे मोठे नुकसान केले आहे. लाखो लोकांचे रोजगार गेले. उद्योग-व्यवसाय बंद पडले. देशांतर्गत व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. गरीबी वाढली, बेरोजगारीचे संकट वाढत आहे, अशा अनेक संकटांचा सामना देशातील नागरिक करत आहे.

Advertisement

करोना संकटाने देशातील व्यापाराचे मोठे नुकसान केले आहे. या विषाणूस रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउन केला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. मेडिकल वगळता अन्य दुकाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांकडून आता ऑनलाइन खरेदीस प्राधान्य दिले जात आहे. तर दुसरीकडे या निर्बंधांमुळे देशांतर्गत व्यापाराचे मोठेच नुकसान केले आहे. या काळात किरकोळ विक्रीत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीतही घट झाली आहे. मात्र, याच काळात हेल्थ केअर उत्पादने, गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

याबाबत मेट्रो कॅश अँड केरी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद मेंदीरत्ता यांनी सांगितले, की जास्त किमतीच्या वस्तू आणि आवश्यक नसणाऱ्या वस्तूंच्या विक्रीत घट दिसून आली आहे. या काळात देशात खाद्य पदार्थ आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ झाली आहे. कंपन्या या वस्तू लोकांना घरपोच देत आहेत. दरम्यान, देशात अनेक ठिकाणी कडक निर्बंध आहेत. त्यामुळे राज्यांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. राज्यांचे महसूल घटले आहेत. तरी देखील या विषाणूस अटकाव करणे सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यांकडून कठोर निर्णय घेण्यात येत आहेत.

Advertisement

करोनाच्या संकटात देशात अनेक बदल झाले आहेत. या काळात अनेक राज्यांनी लॉकडाऊन केले आहे. तसेच काही ठिकाणी किराणा वस्तू सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचा परिणाम व्यापारावर झाला आहे. तसेही करोनामुळे आधीच कोट्यावधींचा रुपयांचा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेत मात्र ट्रेंड बदलला आहे. आर्थिक अडचणी वाढल्याने नागरिक आता पैसे जपून खर्च करत आहेत. महागड्या तसेच आवश्यक नसणाऱ्या वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दैनंदीन आवश्यक वस्तू आणि आरोग्य विषयक वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. या काळात नागरिक आरोग्यााकडे जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे खाद्य पदार्थांनाही मागणी वाढली आहे. आवश्यक नसणारे खर्च पुढे ढकलले जात आहेत. आयुर्वेदिक वस्तूंच्या वापराचाही ट्रेंड आहे. भारतात आयुर्वेदिक वस्तूंना मागणी आहेच. मात्र, या महामारीच्या काळात यामध्ये वाढ झाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply