Take a fresh look at your lifestyle.

करोना लस वाद जोमात सुरूच; पहा कोण, कोणाला नेमके काय म्हटलेय..!

दिल्ली : करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू आहेत. केंद्राकडून लसी मिळत नसल्याने लसीकरण बंद ठेवावे लागतो आहे, अशी राज्यांची तक्रार आहे. केंद्र सरकार मात्र कोणत्याही परिस्थितीत मान्य करायला तयार नाही. राज्यांकडे १.८० कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस शिल्लक असल्याचे केंद्राने म्हटले आहे. करोना लसींचा हा वाद लवकर मिटण्याची चिन्हे नाहीत.

Advertisement

त्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यांना आणखी काही लसी देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार येत्या तीन दिवसात राज्यांन ४८ लसींचे डोस देण्यात येणार आहेत. मात्र, राज्यांची मागणी पाहता हे डोस कमीच आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले, की देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे आजही १.८० कोटींपेक्षा जास्त लसी आहेत. येत्या तीन दिवसांत राज्यांना आणखी ४८ लाख डोस देण्यात येतील. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना २१.८० कोटींपेक्षा जास्त लसी दिल्या आहेत.

Advertisement

राज्यांच्या मागणीचा विचार केला तर राज्यांना मोठ्या संख्येने लसींची आवश्यकता आहे. राज्ये तशी मागणीही करत आहेत. मात्र, पुरेशा प्रमाणात लसी मिळत नसल्याची राज्यांची तक्रार आहे. लसी नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. आणि ते दिसतही आहे. मात्र, केंद्र सरकारने राज्यांकडे १.८० कोटींपेक्षा जास्त लसी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. करोना काळात केंद्र सरकारने विदेशंना लसी दिल्या, या मुद्द्यावरही विरोधक केंद्रावर टीका करत आहेत. केंद्र सरकारने या लसी दुसऱ्या देशांना दिल्या नसत्या तर भारतात आणखी काही कोटी लोकांचे लसीकरण झाले असते. मात्र, करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरले आहे. ऑक्सिजनच्या बाबतीतही असेच झाले. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर लसीकरणाचेही योग्य नियोजन केले नाही.

Advertisement

या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावी आहे. मात्र, केंद्र सरकारला याची चिंताच नाही, अशा शब्दांत त्यांनी कमी होणाऱ्या लसीकरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही  याआधी लसींच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. राजकीय क्षेत्राप्रमाणेच तज्ज्ञ मंडळींनीही लसीकरण कमी होत असल्याच्या मुद्द्यावर इशारा दिला होता. देशात तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या लाटेपासून संरक्षण करायचे असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply