Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे वेध, पाहा किती पगारवाढ होऊ शकते..?

नवी दिल्ली : दर पाच वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू होतो.  सरकारने 2016 मध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली होती. त्यानंतर आता लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता आठव्या वेतन आयोगाचे (8th Pay Commission) वेध लागले आहेत.

Advertisement

देशात आठवा वेतन आयोग लागू करताना घराच्या किमती, राहण्याचा खर्च याचा प्रामुख्याने विचार होणार असल्याची चर्चा आहे. तसेच दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात येणार असल्याचे समजते. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा  असली, तरी सरकारी पातळीवर याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

Advertisement

आठव्या वेतन आयोगानुसार, पगारवाढीसाठी ‘Aykroyd Formula’ याची जोरदार चर्चा आहे.  या फॉर्म्युल्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी महागाई, राहण्याचा खर्च आणि कार्यालयातील कामाचा परफॉर्मन्स, असं एकत्रित पाहिलं जातं.  त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थमंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी हा फॉर्म्युला चांगला असल्याचं म्हटलंय, मात्र त्यावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समजलं..

Advertisement

केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांचं कमीत कमी वेतन 7 हजार रुपयांवरुन 18 हजार झालं. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार महागाई आणि इतर निकषांनुसार दरवर्षी वाढवण्याचीही शिफारस या आयोगाचे प्रमुख न्यायमूर्ती माथुर यांनी केली होती. मात्र, यावर केंद्र सरकारने त्यावर कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply