Take a fresh look at your lifestyle.

आमचे पैसे परत द्या.., विमान कंपन्यांकडे रद्द तिकिटांच्या परताव्यासाठी पाहा किती जणांनी केल्यात तक्रारी..?

मुंबई : कोरोना काळात कठोर निर्बंधांमुळे अनेकांना विमान प्रवास नाकारण्यात आला.. विमानतळावर केलेल्या कोरोना चाचणीत काही जण ‘पॉझिटिव्ह’  (Positive) आढळून आले. तसेच कोरोनासंबंधी अन्य कारणांमुळे अनेकांची विमान प्रवासाची संधी हुकली. आता या लोकांनी रद्द केलेल्या तिकिटांचे आपले पैसे परत मिळविण्यासाठी विमान (Airplane) कंपन्यांचा दरवाजा ठोठावला आहे. मात्र, रद्द तिकिटांचा परतावा मिळविताना हवाई प्रवाशांना संघर्ष करावा लागत आहे.

Advertisement

नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) आकडेवारीतून समोर आलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये विमान कंपन्यांकडे दाखल झालेल्या एकूण तक्रारींपैकी ७५ टक्के प्रवाशांनी रद्द तिकिटांच्या परताव्यासाठी अर्ज केलेले आहेत.

Advertisement

दरमहा आलेल्या तक्रारी (टक्केवारी)

Advertisement
  • ऑक्टोबर…….. ८३.९०
  • नोव्हेंबर………६२.४०
  • डिसेंबर…….. ६१.४०
  • जानेवारी…… ४१
  • फेब्रुवारी……. ५४.६०
  • मार्च……….. ६५.७०
  • एप्रिल……… ७५.९०

मार्चमध्ये ७८ लाख २२ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. एप्रिलमध्ये ही संख्या केवळ ५७ लाख २५ हजार राहिली. प्रवासी घटल्याने दिवसागणिक तोट्यात जाणाऱ्या विमान कंपन्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. तक्रारदारांना परतावा कसा द्यावा, असे मोठे आव्हान विमान कंपन्यापुढे निर्माण झाले आहे.

Advertisement

प्रवाशांना थेट परतावा न देता, प्रवासाची तारीख पुढे ढकलणे, किंवा अन्य पर्याय विमान कंपन्या देत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नसले, नियमित विमानप्रवास करणारे वगळता, इतर प्रवाशांसाठी हा पर्याय अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे परताव्यासाठी अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले नसल्याचे एका खासगी विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply