Take a fresh look at your lifestyle.

अ‍ॅमेझॉनने बंद केली ‘ही’ सर्व्हिस, ग्राहकांवर असा होणार परिणाम..!

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉन.. ई-कॉमर्स क्षेत्रातील एक मोठं नाव. जगभरातील ग्राहकांना घरबसल्या हवी ती वस्तू पोहचविणारी कंपनी.. ग्राहकांना लवकरात लवकर त्यांची आवडीची वस्तू मिळावी, यासाठी ‘अमेझॉन’ (Amazon) कंपनीने भारतात आपली ‘प्राईम नाऊ’ (Prime Now) ही सर्व्हिस सुरु केली होती. त्यासाठी ग्राहकांना ठराविक रक्कम भरावी लागत होती.

Advertisement

कंपनीचा हा ‘ग्रॉसरी डिलीव्हरी प्लॅटफॉर्म’ होता. त्यात ग्रॉसरीसह इलेक्ट्रॉनिक, होम आणि किचनचं आवश्यक सामान मिळत होतं. सामानाची डिलीव्हरी दोन तासांत करण्याचा दावा ‘प्राईम नाऊ’ करीत होतं. ‘अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबर्स’नाच या सेवेचा लाभ घेता येत होता; परंतु कंपनीने आता ही सेवा बंद केली आहे. आता युजर्सला एका वेगळ्या पर्यायात ‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘मेन साईट’वर वस्तू मिळतील.

Advertisement

भारत, जपान आणि सिंगापूरमध्ये ‘प्राईम नाऊ’ अ‍ॅमेझॉनवरून शिफ्ट केलं आहे. सोबतच ‘प्राईम नाऊ अँप’ आणि वेबसाईटही बंद केली आहे. 2014 मध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा ‘प्राईम नाऊ’ सुरु करण्यात आलं होतं. आता ही सेवा बंद केल्यानंतर आता आपले ‘थर्ड पार्टी पार्टनर्स’ आणि ‘लोकल स्टोअर्स’ला अ‍ॅमेझॉनसह जोडतील, असे सांगण्यात आलं.

Advertisement

शॉपिंग, ऑर्डर ट्रॅक करणं आणि ‘कस्टमर केअर’शी संपर्क करणं, यांसारख्या सेवांसाठी आता एकच अ‍ॅप बनविण्यात आलं आहे. दररोज वापर होणाऱ्या वस्तू, गिफ्ट्स, टॉईज, हाय क्वालिटी ग्रोसरी, अशा ‘प्राईम नाऊ’वर मिळणाऱ्या वस्तू आता अ‍ॅमेझॉनवरच उपलब्ध होतील.

Advertisement

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘अ‍ॅमेझॉन फ्रेश’ लाँच करण्यात आलं होतं. आतापर्यंत बंगळुरूपर्यंतच ही सेवा सीमित होती, परंतु आता ही सव्हिस दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि हैदराबादसारख्या आणखी 6 शहरांत सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply