Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. निवडणूक भोवली; तापामुळे शंभरजणांचा मृत्यू, नेमके कारण अद्यापही नाही स्पष्ट

दिल्ली : उत्तरप्रदेश राज्यात रामराज्य आणण्याची घोषणा देणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात करोना विषाणूने हजारो मृत्यू झालेले आहेत. आताही सर्वाधिक मागास म्हणून ओळख असलेल्या फतेहपुर जिल्ह्यातील गावात तापाच्या आजाराने शंभरपेक्षा जास्तजणांचा मृत्यू झालेला आहे. परंतु, तपासणी न झाल्याने याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट नाही.

Advertisement

देशातील सर्वात मागास जिल्हा असलेल्या फतेहपूरला ‘रहस्यमय ताप’ने घेरले आहे. लालाउलीच्या यमुना नदीच्या किनाऱ्यावरील गावात गेल्या एका महिन्यात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना गावच्याच 10 स्मशानभूमीत पुरण्यात आले आहे. तीव्र ताप आणि श्वासोच्छवास घेण्यात अडचणी आल्याने यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावार्ह कोणावरही उपचार झाले नाहीत. फतेहपूर जिल्ह्यात पंचायत निवडणुकीसाठी मतदान होत होते. जिल्हा मुख्यालयापासून 35 किलोमीटर अंतरावर बांदा महामार्गाच्या काठावर असलेल्या लालौली ग्रामसभेत सर्दी, ताप, श्वासोच्छवासाचे रुग्ण वाढले आहेत.

Advertisement

गावचे नवनिर्वाचित सरपंच शमीम अहमद यांच्या मते, 10 एप्रिल रोजी पहिला रुग्ण मृत पावला. तीव्र वाढती सर्दी आणि ताप या घटनेच्या बाबतीत लोकांनी याकडे दुर्लक्ष केले, परंतु ही प्रकरणे वाढतच गेली. यानंतर आता या लक्षणांसह दररोज 1-2 लोकांचा मृत्यू होत आहेत. एका महिन्यात 100 हून अधिक लोक मरण पावले आहेत. कोविड हे मृत्यूचे कारण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Advertisement

गावातील लोकांवर उपचार करण्यासाठी एक  अतिरिक्त पीएचसीवर असून तिथे मोबाईलद्वारे कधीकधी उपचाराची सुविधा उपलब्ध असते. सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळेत हे केंद्र सुरू असते. फतेहपूरचे कलेक्टर अपूर्व दुबे म्हणाले की, ‘लालौलीमध्ये काही दिवसांत या आजाराने बर्‍याच मृत्यूची नोंद झाली आहे. नमुने तपासणीसाठी एसडीएमकडे पाठविले आहेत. अहवालानंतर मृत्यूचे कारण कळू शकेल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply