Take a fresh look at your lifestyle.

‘एलआयसी’ने ‘या’ बँकेतील हिस्सा वाढविला, असा होणार परिणाम..!

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC). भारतीयांचे भविष्य सुरक्षित करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एलआयसीने नवीन व्यवसायातुन आतापर्यंतचे सर्वोच्च 1.84 लाख कोटी रुपयांचे प्रीमियम मिळवले. मार्च-2021मध्ये पॉलिसी क्रमांकाच्या बाबतीत कंपनीचा बाजारातील हिस्सा 81.04 टक्के, तर संपूर्ण आर्थिक वर्षात हा हिस्सा 74.58 टक्के होता.

Advertisement

आता एलआयसीने युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) मधील 2% हिस्सा वाढविला आहे. आता युनियन बँकेत एलआयसीचे एकूण भागभांडवल 5.06% झाले आहे. याआधी एलआयसीची बँकेतील हिस्सेदारी 3.09% होती.

Advertisement

एलआयसीने ‘स्टॉक एक्सचेंज’ला (Stock Exchange) पाठविलेल्या माहितीनुसार, पूर्वी एलआयसीचे युनियन बँकेत 19,79,23,251 इक्विटी शेअर्स होते. आता एलआयसीने प्राधान्य वाटपात बँकेचे 14,78,41,513 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. युनियन बँकेच्या जीवन विमा कंपनीचा हिस्सा 5% पेक्षा जास्त झाला आहे.

Advertisement

युनियन बँकेने आपले क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) बंद केले. याअंतर्गत युनियन बँक एकूण 1,447.17 कोटी रुपये जमा करण्यास यशस्वी झाली. एलआयसी यावर्षी आपला IPO आणण्याची तयारी करत आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2022 साठी केंद्र सरकारच्या Didinvestment चे लक्ष्य पूर्ण केले जाऊ शकेल.

Advertisement

शेअर बाजारामध्ये युनियन बँकेचा शेअर 1.63% वाढून तो प्रति शेअर 37.45 रुपयांवर बंद झाला. तर निफ्टीत 3.82% म्हणजेच 1272 अंकांनी वाढून 34,606.90 अंकांवर बंद झाला. तर, Nifty PSU Bank आज 3.80 टक्क्यांनी वाढून 2348.15 अंकांवर बंद झाली.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply