Take a fresh look at your lifestyle.

लडाखनंतर ‘त्या’ भागात चीनी सैन्य झालेय सक्रीय; पहा काय प्रकार केलाय या शत्रूसैन्याने

दिल्ली : चीन हा हुकुमशाही देश तिबेटवर आपली पकड सातत्याने मजबूत करत असतानाच तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या अन्य देशाच्या जमिनीवरही ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी तिबेट, भारत, भूतान आणि नेपाळच्या सीमेवरील दुर्गम खेड्यांमध्ये चीनी ड्रॅगन वेगाने पायाभूत सुविधांचा विस्तार करीत आहे. अरुणाचलच्या सीमेला लागून असलेल्या भागातही चीनने पायाभूत सुविधांशी संबंधित बांधकाम हाती घेतले आहेत. शुक्रवारी तिबेटवरील चिनी सरकारने केलेल्या श्वेत पत्रातून ही बाब उघडकीस आली आहे.

Advertisement

गेल्या वर्षी लडाखमध्ये सुरू झालेला गतिरोध अद्याप पूर्ण झाला नाही तोच त्या लडाख सीमेवर चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच अरुणाचलला लागून असलेल्या भागात पायाभूत सुविधा उभारल्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावात आलेले आहेत. ‘तिबेट 1951 : मुक्ती, विकास आणि समृद्धी’ या नावाच्या दस्तऐवजामध्ये असे म्हटले आहे की, हिमालयीन क्षेत्राला 4 हजार किलोमीटर लांबीची बाह्य सीमा भाग विकसित करणे आणि तिबेटमधील लोकांचे जीवन सुधारणे महत्वाचे झाले आहे. कठीण परिस्थितीत काम करत असल्याने तिथे दारिद्र्यही तिथे जास्त आहे. सीमाभाग विकसित करून लोकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. चीन-भूतानमध्ये 477 किलोमीटरची सीमारेषा आहे. तर, नेपाळ राष्ट्राबरोबर चीनची 1389 किलोमीटरची सीमा आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply