Take a fresh look at your lifestyle.

अरेरे..! दरडोई उत्पन्नात बांगलादेशची कामगिरी भारतापेक्षा अव्वल, पाहा किती फरक पडलाय..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे जगभर आर्थिक मंदीचे वातावरण आहे. असंघटीत क्षेत्राची तर वाताहत झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग बंद पडले. सततच्या लाॅकडाऊनमुळे भारतातील आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. अशा काळात देशाच्या आर्थिक स्थितीची माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे, त्यात भारतापेक्षा बांगलादेशी (Bangladesh) नागरिकांचं दरडोई उत्पन्न (per capita) अधिक असल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

बांगलादेशच्या ‘प्लानिंग कमिशन’ने (Planing commission) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात बांगलादेशी नागरिकांचे दरडोई उत्पन्न 1,62,371.68 रुपये आहे, तर भारतीयांचं उत्पन्न 1,41,956.74 रुपये इतकं आहे. भारतीयांच्या तुलनेत बांगलादेशींचे उत्पन्न 20,414.94 रुपयांनी जास्त आहे.

Advertisement

मागील आर्थिक वर्षात (2019-20) बांगलादेशींचं प्रती व्यक्ती उत्पन्न 1,50,487.27 रुपये होतं. त्यात वर्षभरातच 11,884.41 रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ 8 टक्के असल्याचं सांगितलं जातं.

Advertisement

2007मध्ये बांगलादेशचं दरडोई उत्पन्न भारतापेक्षा अर्ध होतं. मात्र, बांगलादेश भारतीयांना मागे टाकेल, असा अंदाज जागतिक नाणे निधीने ऑक्टोबर 2020मध्ये व्यक्त केला होता. त्यांचं भाकित खरं ठरलं आहे.

Advertisement

बांगलादेशची आर्थिक प्रगती अशीच राहिल्यास 2025 पर्यंत बांगलादेशचा ‘पर कॅपिटा जीडीपी’ (Per capita GDP) भारतापेक्षा अधिक असेल, असे जागतिक नाणे निधीच्या अहवालात म्हटले आहे. 1971मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला, तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत होती. गरीब देशात बांगलादेशचा समावेश होत होता. मात्र, गेल्या काही दशकांपासून बांगलादेशने चांगली प्रगती केली आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply