Take a fresh look at your lifestyle.

भारत कोमात, तर बांगलादेश जोमात; पहा कशामध्ये टाकलेय भारतासह अनेकांना या देशाने मागे

दिल्ली : करोना संकटाचा मोठा फटका जगास बसला आहे. भारतात तर या विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. याआधी पहिल्या लाटेत केलेले देशव्यापी लॉकडाउन आणि दुसऱ्या लाटेतील कठोर निर्बंध यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेस जबरदस्त फटका बसला आहे. या काळात लाखो लोक बेरोजगार झाले. उद्योग-व्यवसाय बंद पडले. देशांतर्गत व्यापाराने कोट्यावधींचे नुकसान झाले. एकूणच, या संकटात देशास बरेच मागे नेले आहे. या संकटात मात्र भारता शेजारील बांग्लादेशने मात्र आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. आता तर अशी वेळ येऊन ठेपली आहे, की या देशाने दरडोई उत्पन्नात भारताला सुद्धा मागे टाकले आहे. होय हे खरे आहे. काही वर्षांपूर्वी अगदीच गरीब देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लहान देशाने ही किमया केली आहे. बांग्लादेशच्या या यशामागे कारणही तसेच आहे.

Advertisement

या देशाने मागील काही वर्षांपासून देशाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले होते. त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाचे दरडोई उत्पन्न २२२७ डॉलर म्हणजेच १.६२ लाख रुपये इतके होते. दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याने याबाबतीत आता बांग्लादेशने भारतास मागे टाकले आहे. आजमितीस भारताचे दरडोई उत्पन्न १९४७ डॉलर म्हणजेच १.४७ लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे. एका अर्थाने पाहिले तर आता बांग्लादेशी नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त श्रीमंत झाले आहेत.

Advertisement

आशिया खंडातील काही देश वेगाने प्रगती करत आहेत. मात्र, करोनाच्या संकटाने देश अडचणीत सापडले आहेत. वेगाने विकसित होणाऱ्या भारतास तर या संकटाचा मोठा फटका बसला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेस फटका बसला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अन्य देशांनी भारतावर टीका केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतास झटका बसला आहे. एकूणच, भारताच्या विकासाचा वेग कमी झाला आहे. या काळात भारताचा शेजारी असणारा बांग्लादेश मात्र चांगली वाटचाल करत आहे.

Advertisement

मागील वर्षात आयएमएफ संस्थेने सन २०२० या वर्षात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बांग्लादेश भारतास मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त  केला होता. हा अंदाज सुद्धा खरा ठरला आहे. काही वर्षांपूर्वी बांग्लादेशला अतिशय मागास आणि गरीब देश म्हणून ओळखले जात होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. सरकारने तयार केलेल्या धोरणांचा परिणाम म्हणून हा देशही आता वेगाने प्रगती करत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply