Take a fresh look at your lifestyle.

रोहित पवारांनी मोदी सरकारला दिलाय ‘तो’ महत्वाचा सल्ला; पहा काय केलीय सूचना

पुणे : देशात करोना विषाणूच्या संकटाच्या काळात केंद्र सरकारला फायदा होईल,असा निर्णय आरबीआयने घेतला आहे. आरबीआय लवकरच केंद्र सरकारला ९९ हजार १२२ कोटी रुपये देणार आहे. आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या संकट असताना केंद्र सरकारला जीएसटी संकलन, इंधन दरवाढीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळतच आहे. त्यानंतर आता आरबीआयनेही केंद्र सरकारला निधी देण्यास मंजुरी दिली आहे. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. या निधाचा उपयोग कसा करावा, याबाबत त्यांनी केंद्र सरकारला सूचना केली आहे.

Advertisement

त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला करोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि आरबीआयकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये यासाठी वापरता येतील.’

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी ₹ ची तरतूद आणि @RBI कडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी ₹ या कार्यक्रमासाठी वापरता येतील.” / Twitter

Advertisement

रोहित पवार यांनी याआधीही जीएसटी, इंधनावरील कराबाबतही मत व्यक्त केले होते. देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. करोना संकटकाळात आरोग्यावरील खर्च वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने इंधर दर कमी करावेत, असे स्टेट बँकेच्या एका अहवालात म्हटले होते. याच मुद्द्यावर रोहित पवार यांनी केंद्र सरकारला आवाहन करत इंधन दर कमी करावेत, अशी मागणी केली होती.

Advertisement

दरम्यान, देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत करोनाचे रुग्ण वाढत आहे. करोनास आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यम असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे. जगातील अनेक देशात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. भारतातही लसीकरण सुरू आहे. मात्र, देशात लसीकरण अत्यंत संथ गतीने होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध नाहीत. राज्यांना लसी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. देशातील लोकसंख्येचे वेगाने लसीकरण होणे गरेजेचे आहे. देशाची लोकसंख्या पाहता देशात मोठ्या संख्येने लसींची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे आता लसींच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. करोना प्रतिबंधक लसी उपलब्ध करुन वेगाने लसीकरण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यानुसार प्रयत्न करण्यात येत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply