Take a fresh look at your lifestyle.

म्हणून इम्रान खान यांच्यावर भडकलेत विरोधक आणि नागरिकही; पहा काय परिस्थिती आहे पाकिस्तानात

दिल्ली : सध्या पाकिस्तान अनेक संकटांनी घेरला गेला आहे. देशात करोनाचे संकट तर वाढत आहेच, तर दुसरीकडे वाढत्या महागाईने देशातील जनता हैराण झाली आहे. इंधनाच्या दरात वाढ, खाद्यपदार्थांच्या किमती वाढत आहेत. अशातच पाकिस्तान सरकारने नागरिकांना आणखी एक झटका दिला आहे. त्यामुळे नागरिकांत सरकार विरोधात रोष वाढत चालला आहे.

Advertisement

पाकिस्तान तसाही कर्जबाजारी देश म्हणूनच जगात ओळखला जात आहे. कर्ज मिटवण्यासाठी या देशास पुन्हा कर्ज घ्यावे लागत आहे. अर्थव्यवस्थेस आधार देण्यासाठी सुद्धा अन्य देशांकडून कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय या देशासमोर राहिलेला नाही. अशा संकटाने घेरल्या गेलेल्या पाकिस्तानात महागाई सातत्याने वाढत आहे. या समस्येतून मार्ग काढून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी नागरिकांना आणखी त्रास देण्याचे उद्योग येथील सरकारने सुरू केले आहेत. आतही सरकारने असाच एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे.

Advertisement

पाकिस्तान सरकारने देशात विजेचे दर १.७२ प्रति युनिट वाढवल्याची माहिती आहे. पाकिस्तानी कॅबिनेटने २०२० या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत विजेच्या दरात ८२ पैसे प्रति युनिट वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ९० पैसे प्रति युनिट वाढ करण्यात आली होती. पाकिस्तानात सध्या अनेक संकटे निर्माण झाली आहेत. चीनकडून या देशास कर्ज घ्यावे लागत आहे. चीन देखील पाकिस्तानला कर्जरुपाने मदत करत आहे. तरी देखील या देशाच्या समस्या मिटलेल्या नाहीत. मध्यंतरी भारताकडून साखर व कापूस खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, या निर्णयास देशात जोरदार विरोध करण्यात आला. त्यामुळे सरकारला एकाच दिवसात हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे पाकिस्तानला आता जास्त दरात अन्य देशांकडून या वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. एकूणच अशा निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था आधिकच कमजोर होत आहे. मात्र देशाचे राज्यकर्ते आणि विरोधक यांना याचे देणेघेणे नाही, असेच यातून दिसून येत आहे.

Advertisement

देशात निर्माण होत असलेल्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक वस्तूंच्या किमती वाढवण्यात येत आहे. विजेच्या दरात याआधीही वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा असाच निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून नागरिकांना अडचणीत आणणारे असे निर्णय घेण्यात येत असल्याने विरोधक आणि नागरिक सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply