Take a fresh look at your lifestyle.

भारताने शिकवलाय अवघ्या जगाला ‘धडा’; पहा नेमके काय म्हटलेय IMF च्या अहवालात

मुंबई : जगात करोनाचे संकट वाढत आहे. मात्र, भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या काळात देशात निर्माण झालेल्या विदारक परिस्थितीने जगातील अनेक देशांचे टेन्शन वाढले आहे. कारण, भविष्यात करोनाचे संकट आणखी वाढण्याचा इशाही आधीच देण्यात आला आहे. आता असाच जगाचे टेन्शन वाढवणारा अहवाल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) संघटनेने दिला आहे. भारतात करोना विषाणूची आलेली दुसऱ्या लाटेने भविष्यात जगात यापेक्षा भयानक संकटाचे संकेत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. भारतात दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून परिस्थिती अजूनही गंभीर आहे. या संकटाकडे पाहिल्यास असा इशारा मिळतो, की भविष्यात जगातील विकसनशील देशात करोनामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

देशात करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अतिशय घातक सिद्ध होत आहे. या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतात दुसऱ्या लाटेत निर्माण झालेले हे संकट म्हणजे, जगातील विकसनशील देशांसाठी भविष्यातील संकटाचा इशारा आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला आहे. भारतातील या परिस्थितीवर जगाचे लक्ष आहे. त्यामुळे येथील करोनाच्या संकटावर अहवाल येत असतात. याआधीही असे अहवाल आले आहेत. आता सुद्धा जो अहवाल आला आहे. त्यातून विकसनशील देशांना एक प्रकारे इशाराच देण्यात आला आहे. तसेच भारतातील संकटातून शहाणे होण्यासही सुचवण्यात आले आहे. कारण, जगातील अनेक देश अद्याप करोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचले आहेत. काही देशात दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढत असतानाच या देशांनी कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करत त्यास आटोक्यात आणले. तसेच लसीकरणावर भर दिला. भारतास मात्र असे करणे शक्य झाले नाही. दुसऱ्या लाटेत गाफील राहिल्याने देशभरात करोना वेगाने पसरला.

Advertisement

आजही या लाटेस नियंत्रणात आणता आलेले नाही. राज्य सरकार व केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे काही प्रमाणात करोना नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. मात्र अजूनही दररोज दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तसेच मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळे करोनाचा धोका टळलेला नाही. करोनास रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यम असल्याचे या अहवालातही म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply