Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांना ‘ते’ सिद्ध करण्याचे राष्ट्रवादीने दिले आव्हान; पहा नेमक्या कोणत्या मुद्द्यावर केलीय टीका

मुंबई : तौक्ते चक्रीवादळानंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेले वादळ अजूनही थांबलेले नाही. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांत या मुद्द्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आधी पंतप्रधान मोदींचा गुजरात दौरा, त्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त गुजरातसाठी जाहीर केलेला एक हजार कोटी रुपयांचा मदत निधी यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कडाडून टीका केली. त्यास तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली.

Advertisement

आता या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. कोकणातील जनतेला भरपाई देणारच आहोत. मात्र, राज्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आग्रह केला पाहिजे, त्यांनी जर असे केले तर ते राज्यातील जनते बरोबर आहेत, हे सिद्ध होईल असे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. फडणवीस यांनी राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. मात्र, फडणवीस केंद्राकडे आग्रह धरत नाहीत. राज्य सरकार काय मदत करणार यावरच बोलत आहेत. ते राज्या बरोबर नाहीत, असेच आता सिद्ध होत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Advertisement

तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यात मोठे नुकसान केले. या व्यतिरिक्त अन्य चार राज्यांनाही या वादळाचा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली. तसेच या राज्यासाठी एक हजार कोटी रुपये मदतीची घोषणा केली. त्यानंतर अन्य नुकसानग्रस्त राज्यांनाही मदत दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, या मुद्द्यावर राज्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष केंद्र सरकारवर भेदभाव केल्याचा आरोप करत आहेत. मोंदींनी फक्त गुजरातचाच दौरा का केला, अन्य राज्यांबाबत भेदभाव का केला जात आहे, असे सवाल विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.

Advertisement

NCP on Twitter: “. @narendramodi पाहणीसाठी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला १००० कोटींचे पॅकेज दिले. आता जनतेने प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस आमच्याकडे बोट दाखवत आहेत. आम्ही भरपाई देणार आहोत, पण फडणवीसांनी मोदींकडे आग्रह धरून राज्याला मदत मिळवून दिली पाहिजे. – @nawabmalikncp” / Twitter

Advertisement

केंद्र सरकारने याआधी तौक्ते चक्रीवादळाने मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियास दोन लाख रुपये तर जखमी झालेल्या व्यक्तींना पन्नास  हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, तरी देखील विरोधक या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे आता भाजप व अन्य विरोधी पक्षांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply