Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ सहा राज्यांचा मृत्युदर वाढतोय; पहा नेमके काय म्हटलेय आरोग्य मंत्रालयाने

दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ अजूनही कायम आहे. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील वीस दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. तसेच करोना मुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असताना दुसरीकडे मात्र रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूदर वाढत चालला आहे. काही राज्यात हा दर कमी आहे तर देशातील सहा राज्यात मात्र मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

Advertisement

देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब आणि दिल्ली या सहा राज्यात सर्वाधिक करोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. देशात करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, मृत्यूदर वाढला आहे. काही दिवसांपासून रोज चार हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. करोना बरोबरच आता ब्लॅक फंगस या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या आजाराचे आठ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. केंद्र सरकारने या आजाराची गंभीर दखल घेतली आहे. या आजाराची माहिती देण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. या आजारावरील औषधाचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. काही राज्यांनी या आजारास महामारी घोषित केले आहे.

Advertisement

देशात करोनाचे संकट मोठे आहे. या आजारास रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यम आहे. देशात सध्या १८ कोटी ४१ लाख नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर लसीकरणाचा हा आकडा अत्यंत कमी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनीही लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

मात्र, दुसरीकडे देशात लसीकरण अत्यंत संथ गतीने होत आहे. गेल्या काही दिवसात तर दररोज लसीकरणाची संख्या कमी होत आहे. करोनाच्या वाढत्या संकटात असे होणे धोक्याचे ठरणार आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे देशात करोना लसींची टंचाई जाणवत आहे. लस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे राज्यांना वेळेत आणि पुरेशा लसींचा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply