Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी’ शेतकऱ्यांना सरसकट 10 हजार अनुदान द्या; दानवेंनी केली मागणी

जालना : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारने खत सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी काळाबाजार रोखावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट 10 हजार अनुदान देण्याची मागणी  भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने तातडीने कार्यवाही करावी. तब्बल १४ हजार ७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदी सरकारने देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना दिलासा दिला आहे. आता राज्य सरकारनेही असाच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

Advertisement

गेल्या वर्षीही खताच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी नाडला गेला होता. तशी वेळ येऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने खत वितरणाची प्रणाली आखून द्यावी, शेतकऱ्यास पीक कर्जासाठी बँकांकडून अडवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि खताचा काळाबाजार रोखणारी यंत्रणा तातडीने उभी करावी, असेही आवाहन दानवे यांनी केले आहे.

Advertisement

दरवर्षी काळाबाजार, साठेबाजी आणि आर्थिक अडवणूक यांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेएवढे खत राज्यात उपलब्ध होत नाही. त्यासाठी तातडीने कार्यवाही करून बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी ठोस कार्यवाही करावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply