Take a fresh look at your lifestyle.

केजरीवाल यांना जावडेकरांनी म्हटले ‘कारणबहाद्दर’; पहा कशाच्या मुद्द्यावर झालेत आरोप-प्रत्यारोप

दिल्ली : देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारात वाद सुरू आहेत. राज्यांमध्ये लसीकरण मोहिम सुरू आहे मात्र, या मोहिमेत सातत्याने अडचणी येत आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे, केंद्र सरकारकडून पुरेशा लसी मिळत नाहीत. राज्यांनी याबाबत केंद्राकडे तक्रारीही केल्या आहेत. केंद्राने मात्र या तक्रारीत तथ्य नसल्याचे स्पष्ट करत आरोप फेटाळून लावले आहेत.

Advertisement

आता याच मुद्द्यावर भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लसींच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की शनिवारी युवकांचे लसीकरण बंद करण्यात आले. केंद्र सरकारने जितक्या लसी दिल्या होत्या, त्या सगळ्या लसी संपल्या आहेत. लसींचे काहीच डोस शिल्लक असून हे डोस लसीकरण केंद्रांनी देत आहोत. मात्र, या लसी खूपच कमी आहेत. लवकरच त्याही संपतील. रविवारी युवकांचे सर्वच लसीकरण केंद्रे बंद होतील.

Advertisement

दिल्लीत दर महिन्यास ८० लाख लसींची गरज आहे. मात्र, १६ लाखच लसींचे डोस मिळाले आहेत. जून महिन्यासाठी केंद्र सरकारने दिल्लीचा लसींचा कोटा आणखी कमी केला आहे. याबाबत केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र सुद्धा पाठवले आहे. त्यानंतर भाजपने सुद्धा या मुद्द्यावर प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री केजरीवाल सातत्याने दिल्लीच्या नावावर राजकारण करत आहेत. केंद्र सरकारने दिल्लीसाठी आधीच ५० लाख डोस दिले आहेत. आगामी काळात आणखी लसी केंद्र सरकार देणार आहे.

Advertisement

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कारणे सांगणे आता बंद करावे. ऑक्सिजन टंचाईच्या मुद्द्यावरही त्यांनी असेच केले होते, अशी टीका जावडेकर यांनी केली. दरम्यान, देशभरात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र लसीकरण अत्यंत संथ गतीने होत आहे. काही दिवसांपासून तर लसीकरणाच्या संख्येतही घट होत आहे. लसीकरणाची संख्या वाढणे गरजेचे आहे. करोना लसी वेळेवर मिळत नसल्यानेच असे होत असल्याचे राज्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकार केंद्राकडे तक्रार करत आहेत. केंद्र सरकार मात्र राज्यांकडे लसीचे डोस शिल्लक असल्याचे म्हणत आहे. मग, असे असेल तर लसीकरण वेगाने का होत नाही, काही ठिकाणी लसीकरण का बंद करावे लागत आहे, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply