Take a fresh look at your lifestyle.

काळ्या बुरशीला ‘तो’ घटक आहे जबाबदार; पहा नेमके काय म्हटलेय कॉंग्रेसने

दिल्ली : देशात आता करोना बरोबरच आणखी एका नव्या आजाराचे संकट आले आहे. ब्लॅक फंगस या आजाराचे रुग्ण देशात झपाट्याने वाढू लागले आहेत. जगात सध्या फक्त भारतातच या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. काही राज्यांनी तर या आजारास महामारी म्हणूनही घोषित केले आहे. आता या आजारावरुनही राजकारण सुरू झाले आहे. या आजाराचे रुग्ण फक्त भारतातच आढळत असल्याने विरोधी पक्षांनी मोदी सरकाच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर ट्विट करत केंद्र सरकारवर कडाडून प्रहार केला आहे. राहुल गांधी म्हणाले, की ‘मोदी सिस्टिमच्या कुशासनामुळे फक्त भारतातच करोना बरोबर ब्लॅक फंगसची महामारी आहे. करोना लसींची कमतरता तर आहेच शिवाय, आता या नव्या महामारीवरील औषधांचीही कमतरता निर्माण झाली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सुद्धा देशाचे पंतप्रधान टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच राहतील.’

Advertisement

करोना विषाणूच्या मुद्द्यावर राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. याआधीही त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी करोनाबाबत सरकारला वेळोवेळी सावध केले, इशाराही दिला होता. तसेच या महामारीस रोखण्यासाठी काही उपायही सुचवले होते. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण, सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले. आज देशात करोनाने अगदीच विक्राळ रुप धारण केले आहे. करोना तर थैमान घालत आहेच. त्याच्या जोडीला आता ब्लॅक फंगसचा आजारही बळावत चालला आहे. या आजारावर औषधांची देशात कमतरता आहे. करोना विषाणूबाबतही असेच घडले आहे. करोना प्रतिबंधक लसींची टंचाई देशात निर्माण झाली आहे. त्यामुळे लसीकरणात अडथळे येत आहेत.

Advertisement

करोना, ब्लॅक फंगस यांसारखे घातक आजार वाढत असताना सरकार मात्र परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे. गेल्या काही दिवसात ब्लॅक फंगसचे अनेक रुग्ण देशात आढळले आहेत. केंद्र सरकारनेही या आजाराची दखल घेत राज्य सरकारांना सूचना दिल्या आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या कारभारावर विरोधी पक्ष मात्र आक्रमकपणे टीका करत आहेत. करोनाची तिसरी लाट येणार असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. लसीकरणाच्या मुद्द्यावरही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply