Take a fresh look at your lifestyle.

आय्यो.. ‘त्या’ राज्यात सापडलेत 40 हजार करोनाबाधित मुले; पहा नेमकी काय आहे परुस्थिती

दिल्ली : करोनाच्या संकटात आता लहान मुलांनाही धोका निर्माण झाला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका राहिला असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. प्रत्यक्षात मात्र, दुसऱ्या लाटेतच हजारो मुले करोना संक्रमित होत आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेच वयोवृद्ध नागरिकांना धोका.. दुसऱ्या लाटेत तरुणांना जास्त धोका अशा बातम्या येतच होत्या. त्यानंतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, करोनाने हा अंदाजही खोटा ठरवला आहे. दुसऱ्याच लाटेत मुले मोठ्या संख्येने संक्रमित होत आहेत. देशातील कर्नाटक राज्यात याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Advertisement

या राज्यात करोना रुग्ण सुद्धा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे निर्बंध आणखी काही दिवस वाढवण्याचा निर्णय या राज्याने नुकताच घेतला आहे. या राज्यात मुलांमध्ये करोनाचे संक्रमण जास्त आहे. गेल्या दोन महिन्यांत ९ वर्षांपेक्षा कमी वयाचे तब्बल ४० हजार मुले करोना संक्रमित झाली आहेत. ९ वर्षांपर्यंत वय असणारी ३९ हजार ८४६ तर १० ते १९ वर्षे वयोगटातील १ लाख ५ हजार ४४ मुलांना करोनाने संक्रमित केले आहे. १८ मार्च ते १८ मे या दोन महिन्यांतील ही आकडेवारी आहे. मागील वर्षात ज्यावेळी करोना विषाणू देशात आला, त्यावेळी पहिल्या लाटेत परिस्थिती वेगळी होती. मार्च २०२० मध्ये ९ वर्षांपर्यंत वयाची १७ हजार ८४१ तर १० ते १९ वयोगटातील ६५ हजार ५५१ मुले करोना संक्रमित होती. म्हणजेच, दुसऱ्या लाटेत मुले संक्रमित होण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.

Advertisement

राज्यात हा आकडा फार मोठा आहे. लहान मुलांना करोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, राज्यात करोना वेगाने पसरत असल्याने राज्य सरकारचे प्रयत्नही अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. यावरून असे दिसून येत आहे, की दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. डॉक्टर देखील असेच सांगत आहेत. त्यामुळे या काळात मुलांच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. दुसऱ्या लाटेतच अशी स्थिती निर्माण झाली आहे तर तिसऱ्या लाटेत परिस्थिती जास्त गंभीर होणार नाही, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारांना याचा अंदाज आल्याने आतापासूनच नियोजनास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनेही याबाबत राज्यांना काही सूचना दिल्य आहेत. त्यानुसार राज्ये नियोजन करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply