Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून करोना रुग्णाने घेतला गळफास; ‘त्या’ बाबींच्या पूर्ततेसाठी झाले पोस्ट मार्टेमही

बीड : करोना रुग्णांचे हॉस्पिटल बिल ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. हृदयविकाराचा धक्का किंवा इतर मोठ्या आजारात येत असलेल्या बिलाच्या रकमेपेक्षा जास्त बिल कोविड 19 आजाराचे होत आहे. एका गरीब रुग्णाना हेच बिल खूप जास्त वाटल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Advertisement

बीड तालुक्यातील तांदळ्याची वाडी येथील रहिवासी असलेल्या रामलिंग यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यावर करोना चाचणी घेण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह व एचआरसीटी स्कोअर 14 इतका आला होता. दीप हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करून ते बरे झाले होते. दरम्यान, पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्यांनी रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या चॅनल गेटला पंचाने गळफास घेत आत्महत्या केली. रुग्णालयाने उपचारांचे २ लाखांचे बिल रुग्णाकडे मागितल्याने तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

Advertisement

मग, हे प्रकरण फ़क़्त करोना रुग्णाच्या मृत्यूचे न राहता आत्महत्येचे बनले. मग या प्रकरणात कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी व भविष्यात काही कायदेशीर अडचणी येऊ नयेत यासाठी शवविच्छेदनाचा निर्णय पोलिसांनी घेतला. तसे पत्र आरोग्य विभागाला दिल्यावर मग पोस्ट मार्टेम करण्यात आले. या घटनेने अनेकजणांनी हालहाल व्यक्त केली आहे. नातेवाईकांनी 1 लाख 60 हजार रुपये आम्ही रुग्णालयाला भरले असतानाही अशी घटना घडल्याने नातेवाईक हेलावले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply