Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. करोनामुळे झालेत ‘इतके’ लाख मृत्यू; पहा काय म्हटलेय ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टीक्समध्ये

दिल्ली : जगात करोनाचा विळखा घट्ट होत आहे. या विषाणूच्या दुसऱ्या लाटेने काही देशात थैमान घातले आहे. या आजाराने आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण गेले आहे. ऑक्सिजनअभावी देखील अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहे. या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत मात्र जागतिक आरोग्य संघटनेने शंका उपस्थित केली आहे. कारण, देशांच्या सरकारी आकडेवारीनुसार जे मृत्यू दिसत आहेत. प्रत्यक्षात मात्र, त्यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू झाले आहेत, असा दावा डब्ल्यूएचओने केला आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगात आतापर्यंत ६० ते ७० लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, ३४.४६ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद जगाने घेतली आहे. वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टीक्स जाहीर करताना आरोग्य संघटनेने करोनामुळे कितीतरी आधिक मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. याबाबत आधिक स्पष्ट करताना आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की सन २०२० मध्येच जगात करोनामुळे ३० लाख मृत्यू झाले होते. मात्र, जगातील विविध देशांनी घेतलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी १२ लाख आहे. करोनामुळे यापेक्षा कितीतरी आधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणची आकडेवारी उपलब्ध नाही. मे २०२१ पर्यंत जगात करोनामुळे ३४ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा सरकारी आकडा आहे. प्रत्यक्षातील मृत्यू यापेक्षा दोन ते तीन पट जास्त आहेत., असे आरोग्य संघटनेच्या असिस्टंट डायरेक्टर समीरा आसमा यांनी सांगितले.

Advertisement

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक देशात परिस्थिती गंभीर होती. दुसऱ्या लाटेत तर काही देशात परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. या काळात अनेक रुग्णांना योग्य उपचार मिळाले नाहीत. रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे करोनामुळे प्रत्यक्षात जास्तच मृत्यू झाले आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Advertisement

दरम्यान, आरोग्य संघटनेने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य संघटनेच्या या दाव्यामुळे आता नव्याच वादाला तोंड फुटण्याची शक्यता दिसत आहे. करोना काळात आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर अमेरिकेसह काही देशांनी नाराजी व्यक्त केली आहेच. चीनच्या बाजूने केलेल्या वक्तव्यांमुळेही जगातील देश नाराज आहेत. त्यातच आता मृत्यूंच्या संख्येवर संशय व्यक्त केल्याने वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत. आरोग्य संघटनेच्या या दाव्यावर अद्याप कोणत्याही देशाने प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या दाव्यावर जगातील देश काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply